पोळ्याला फुटणार १० लाख नारळ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 3, 2021 04:02 AM2021-09-03T04:02:51+5:302021-09-03T04:02:51+5:30
औरंगाबाद : वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांची कृतज्ञता मानण्याचा दिवस म्हणजे ‘पोळा’ सण होय. या दिवशी जिल्ह्यात सुमारे १० ...
औरंगाबाद : वर्षभर शेतात राबणाऱ्या बैलांची कृतज्ञता मानण्याचा दिवस म्हणजे ‘पोळा’ सण होय. या दिवशी जिल्ह्यात सुमारे १० लाख नारळ फुटतील, असा होरा होलसेल व्यापाऱ्यांनी व्यक्त केला.
वर्षभरात सर्वाधिक नारळाची विक्री पोळा सणाला होते. त्यानंतर नवरात्रामध्ये नारळ मोठ्या प्रमाणात विकले जातात. आधुनिक यंत्रामुळे बैलांची कामे कमी झाली. मात्र, अजूनही अनेक शेतकऱ्यांकडे ‘सर्जा-राजा’ची जोडी पाहायला मिळते. पोळा सणाला नारळाचा मान दिला जातो. नारळ फोडून पोळा फुटला, असे म्हणतात. यामुळे जिल्ह्यात विशेषत: ग्रामीण भागात नारळाची मोठी विक्री होते. तामिळनाडू, आंध्रप्रदेशातून जिल्ह्यात नारळ आणण्यात आले आहेत. होलसेल विक्रीत मागील वर्षीच्या तुलनेत यंदा नारळ २०० रुपयांनी स्वस्त झाले आहेत. सध्या १,३०० ते १,६०० रुपये प्रति १०० नग विकले जात आहेत, तर किरकोळ विक्रीत ग्राहकांना १५ ते २५ रुपये प्रतिनग नारळ खरेदी करावा लागतो.