दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद - नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या

By ऑनलाइन लोकमत | Published: September 5, 2024 08:08 PM2024-09-05T20:08:12+5:302024-09-05T20:08:45+5:30

प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे विशेष रेल्वे

10 Rounds of Secunderabad - Nagarsol Special Train on the occasion of Dussehra, Diwali | दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद - नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या

दसरा, दिवाळीनिमित्त सिकंदराबाद - नगरसोल विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या

छत्रपती संभाजीनगर : दसरा, दिवाळीनिमित्त प्रवाशांची होणारी गर्दी लक्षात घेऊन दक्षिण मध्य रेल्वेतर्फे सिकंदराबाद - नगरसोल - सिकंदराबाद विशेष रेल्वेच्या १० फेऱ्या चालविण्यात येणार आहेत.

सिकंदराबाद -नगरसोल विशेष रेल्वे सिकंदराबाद येथून ९ ऑक्टोबर ते ६ नोव्हेंबरदरम्यान दर बुधवारी सायंकाळी ५ वाजता सुटेल. लिंगमपल्ली, शंकरपल्ली, विकाराबाद, जाहिराबाद, बिदर, भालकी, उदगीर, लातूर रोड, परळी वैजनाथ, गंगाखेड, परभणी, मानवत रोड, सेलू, जालना, छत्रपती संभाजीनगर, रोटेगावमार्गे नगरसोल येथे गुरुवारी सकाळी ८ वाजता पोहोचेल. तर नगरसोल ते सिकंदराबाद विशेष रेल्वे नगरसोल येथून १० ऑक्टोबर ते ७ नोव्हेंबरदरम्यान दर गुरुवारी रात्री १० वाजता सुटेल आणि सिकंदराबाद येथे शुक्रवारी सकाळी १०:५० वाजता पोहोचेल.

Web Title: 10 Rounds of Secunderabad - Nagarsol Special Train on the occasion of Dussehra, Diwali

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.