शंभर कोटींचे रस्ते; पुण्याच्या तज्ज्ञांकडून तपासणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 18, 2019 11:56 PM2019-04-18T23:56:47+5:302019-04-18T23:57:13+5:30

महाराष्टÑ शासनाने १०० कोटी रुपयांचे अनुदान मनपाला दिले आहे. या अनुदानातून ३० रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या शहरात एकाच वेळी ७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांच्या गुणवत्तेची तपासणी बुधवारी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांनी केली

100 Crore Roads; Pune inspection | शंभर कोटींचे रस्ते; पुण्याच्या तज्ज्ञांकडून तपासणी

शंभर कोटींचे रस्ते; पुण्याच्या तज्ज्ञांकडून तपासणी

googlenewsNext
ठळक मुद्देगुणवत्तेकडे लक्ष : प्रयोगशाळेत नमुनेही पाठविले

औरंगाबाद : महाराष्टÑ शासनाने १०० कोटी रुपयांचे अनुदान मनपाला दिले आहे. या अनुदानातून ३० रस्त्यांची कामे हाती घेण्यात आली आहेत. सध्या शहरात एकाच वेळी ७ रस्त्यांची कामे सुरू आहेत. या कामांच्या गुणवत्तेची तपासणी बुधवारी पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांनी केली. रस्ते बांधणीत वापरण्यात आलेली सामुग्रीही तज्ज्ञांनी घेतली. प्रयोगशाळेत सर्व नमुने पाठविण्यात आले. याचा अहवाल लवकरच मनपाला देण्यात येणार आहे.
शंभर कोटींची कामे मिळविण्यासाठी कंत्राटदारांमध्ये कमालीची स्पर्धा लागली होती. मनपा पदाधिकाऱ्यांनी सर्व कंत्राटदारांना एकत्र बसवून रिंग पद्धतीने कामे वाटून दिली. कंत्राटदारांमध्ये स्पर्धा झाली असती तर मनपाचा फायदा झाला असता. सर्व कंत्राटदारांनी सोयीनुसार ठराविक दर भरून ही कामे मिळविली आहेत. एका कंत्राटदाराला २५ कोटींपर्यंतची कामे देण्यात आली. फेब्रुवारीअखेर विविध कामांना सुरुवात झाली. या कामांच्या गुणवत्तेवर पहिल्या दिवसापासून प्रश्नचिन्ह उपस्थित करण्यात येत आहे. त्यामुळे मनपा आयुक्त डॉ. निपुण विनायक यांनी खास पुण्याच्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयातील तज्ज्ञांना तपासणीच्या कामात सहकार्य करण्याची विनंती केली. यासाठी लागणारी फीसुद्धा मनपाने भरली. त्यानंतर बुधवारी पुण्याहून खास पथक शहरात दाखल झाले. पथकाने सर्व सात रस्त्यांची अत्यंत बारकाईने पाहणी केली. काही तांत्रिक मुद्दे मनपा अधिकाऱ्यांना सांगण्यात आले. कामात आणखी सुधारणा कशी करता येईल, यादृष्टीने त्यांनी मार्गदर्शन केले. आतापर्यंत झालेल्या कामाची तपासणीही करण्यात आली. सर्व रस्त्यांचे कोअर कटर पद्धतीने नमुने घेण्यात आले. हे नमुने पुण्याच्या प्रयोगशाळेत आज पाठविण्यात आले. १०० कोटींमधील सर्व ३० रस्त्यांच्या गुणवत्ता याच पथकाकडून तपासण्यात येणार आहेत. यावेळी कार्यकारी अभियंता एम. बी. काझी, उपअभियंता फारुक खान आदींची उपस्थिती होती.
या रस्त्यांची केली पाहणी
निरालाबाजार ते मनपा कार्यालय
टीव्ही सेंटर ते जकात नाका
कामगार चौक ते खंडपीठ
हडको कॉर्नर ते डी. मार्टपर्यंत
सोहम मोटर्स येथील रस्ता
एमआयडीसी चिकलठाणा
निरालाबाजार ते मनपा कार्यालय
-------------

Web Title: 100 Crore Roads; Pune inspection

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.