अर्जुन खोतकरांचा १०० कोटींचा घोटाळा; आता १ लाख कोटींची जमीनही बळकावणार,किरीट सोमय्यांचे आरोप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 19, 2021 06:46 PM2021-11-19T18:46:11+5:302021-11-19T18:47:44+5:30
Kirit Somaiya On Arjun Khotkar: काही दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि जालना येथे ईडीची छापेमारी झाली. यामागे अर्जुन खोतकर यांच्या राम नगर येथील साखर कारखान्याचा व्यवहार आहे.
औरंगाबाद : शिवसेनेचे माजी मंत्री अर्जुन खोतकर (Arjun Khotkar ) यांनी रामनगर येथील साखर कारखाना खरेदीविक्रीच्या व्यवहारादरम्यान १०० कोटींचा घोटाळा केला आहे (Kirit Somaiya On Arjun Khotkar's 100 cr scam ) . तसेच आता ते कारखान्याची १ लाख कोटींची जवळपास २५० एकर जमीन बळकाविण्याच्या प्रयत्नात आहेत असा सनसनाटी आरोप भाजपच्या किरीट सोमय्या ( Kirit Somayya) यांनी केला. ते शहरात एका पत्रकार परिषदेत बोलत होते. औरंगाबाद शहर शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. इथे येऊन सोमय्यांनी सेनेच्या माजी मंत्र्यावर आरोप केल्याचे भाजप-सेना वाद आणखी चिघळत जात असल्याचे चित्र आहे.
काही दिवसांपूर्वी औरंगाबाद आणि जालना येथे ईडीची छापेमारी झाली. यामागे अर्जुन खोतकर यांच्या राम नगर येथील साखर कारखान्याचा व्यवहार असल्याची माहिती माजी खासदार किरीट सोमय्या यांनी दिली.ते पुढे म्हणाले, हा व्यवहार २०१२ ते २०२१ या दरम्यान झाला. दोन्ही ठिकाणाचे व्यापारी आणि उद्योगपती यांच्या माध्यमातून अर्जुन खोतकर यांनी जवळपास १०० कोटींचा घोटाळा केला आहे. आता खोतकर हे कारखान्यास शेतकऱ्यांनी दिलेली जवळपास १ लाख कोटींची २५० एकर शेतजमीन ताब्यात घेण्याची तयारी सुरु आहे. माझ्याकडे संबंधित शेतकरी आणि काही व्यक्तींनी माहिती दिली, त्यावरून मी ईडी, राज्य सरकार आणि आता केंद्र सरकारकडे तक्रार केली आहे, असेही त्यांनी सांगितले.
शरद पवार यांची मान खाली जायला हवी
अनिल देशमुख यांच्या प्रकरणात राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार हे आता धमकी देत आहेत. मुळात ठाकरे सरकार मधील २३ मंत्र्यांची चौकशी सुरु आहे. यात अनिल परब, हसन मुश्रीफ आहेत. राष्ट्रवादीचे अनेक मंत्री आहेत. यामुळे धमकी देण्या ऐवजी शरद पवार यांची मान शरमेने खाली जायला हवी असे ही सोमय्या यावेळी म्हणाले.