पीएनजी सन्सतर्फे हिऱ्याच्या दागिन्यांच्या मेकिंगवर १०० टक्के सूट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 7, 2021 04:02 AM2021-02-07T04:02:12+5:302021-02-07T04:02:12+5:30

ट्विंकलिंग डिलाइट्स डायमंड कलेक्शन लाँच औरंगाबाद : डेलिवेअर म्हणून हिऱ्याच्या दागिन्यांची हौस पूर्ण व्हावी या हेतूने ‘ ट्विंकलिंग डिलाइट्स’ ...

100% discount on diamond jewelry making by PNG Sons | पीएनजी सन्सतर्फे हिऱ्याच्या दागिन्यांच्या मेकिंगवर १०० टक्के सूट

पीएनजी सन्सतर्फे हिऱ्याच्या दागिन्यांच्या मेकिंगवर १०० टक्के सूट

googlenewsNext

ट्विंकलिंग डिलाइट्स डायमंड कलेक्शन लाँच

औरंगाबाद : डेलिवेअर म्हणून हिऱ्याच्या दागिन्यांची हौस पूर्ण व्हावी या हेतूने ‘ ट्विंकलिंग डिलाइट्स’ हे हिऱ्यांच्या दागिन्यांचे कलेक्शन पीएनजी सन्सने सादर केले आहे.

व्हॅलेंटाईन डेनिमित्त ‘डायमंड फेस्ट’अंतर्गत हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंगवर सूट जाहीर केली आहे. ही सूट १४ फेब्रुवारीपर्यंत सुरू राहणार आहे.

‘वर्किंग वुमन कॉलेज’मध्ये जाणाऱ्या युवतींच्या दररोजच्या वापरण्यासाठी लागणाऱ्या दागिन्यांच्या गरजा लक्षात घेऊन ‘ट्विंकलिंग डिलाइट्स’ कलेक्शन लाँच केले आहे. यामध्ये फिंगर रिंग, इअररिंग, पेडन्ट, पेडन्ट सेटचा समावेश आहे. या कलेक्शनची रेंज १० हजार रुपयांपासून पुढे आहे. १४ कॅरेटच्या दागिन्यांना युवा, वर्किंग वुमेेनकडून चांगला प्रतिसाद मिळत आहे, अशी माहिती पीएनजी सन्सचे प्रवर्तक अजित गाडगीळ यांनी दिली.

‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त डायमंड फेस्टअंतर्गत १४ फेबुवारीपर्यंत हिऱ्यांच्या दागिन्यांच्या मेकिंगवर १०० टक्के सूट देण्यात आली आहे; कारण हिरा हा प्रेम व्यक्त करण्याचे एक माध्यम समजले जाते, असे पीएनजी सन्सचे विक्री प्रमुख व सीएफओ आदित्य मोडक यांनी नमूद केले. महाराष्ट्र, गुजरात आणि कर्नाटक येथील २३ शहरांतील २९ दालनांत ‘डायमंड फेस्ट’ ऑफर उपलब्ध आहे.

Web Title: 100% discount on diamond jewelry making by PNG Sons

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.