रस्त्यावर कचरा केल्यास १ हजार, थुंकल्यास ५०० रुपये दंड; महापालिका प्रशासनाचा मोठा निर्णय
By मुजीब देवणीकर | Published: September 8, 2023 07:16 PM2023-09-08T19:16:44+5:302023-09-08T19:17:05+5:30
नागरिकांना या संदर्भात काही आक्षेप असल्यास सात दिवसांत महापालिकेकडे नोंदविण्याचे आवाहन
छत्रपती संभाजीनगर : रस्त्यावर कचरा फेकणाऱ्या, लघुशंका करणाऱ्यांना एक हजार रुपये, सार्वजनिक ठिकाणी थुंकणाऱ्यांना ५०० रुपये जागेवरच दंड करण्याचा मोठा निर्णय मनपा प्रशासनाने घेतला आहे. मोठ्या प्रमाणात कचरा निर्मिती करणाऱ्यांनी रस्त्यावर कचरा टाकला तर तब्बल २० हजार रुपये मोजावे लागणार आहेत. नागरिकांना या संदर्भात काही आक्षेप असल्यास त्यांनी सात दिवसांत महापालिकेकडे नोंदवावा असे आवाहनसुद्धा प्रशासनाने केले आहे.
अशी आहे दंडाची सुधारित रक्कम
-रस्त्यावर घाण, कचरा टाकणे-१,०००
-हॉटेल, दुकानांनी रस्त्यावर कचरा, घाण टाकल्यास - २,०००
-मोठ्या प्रमाणात कचरा तयार करणाऱ्यांनी रस्त्यावर कचरा टाकल्यास -२०,०००
-सार्वजनिक ठिकाणी थुंकणे -५००
-उघड्यावर लघुशंका करणे -१,०००
-उघड्यावर शौच करणे -२०००
-कचरा वर्गीकरण न करणे -५००
-हॉटेल, संस्था, दुकानांनी कचरा वर्गीकरण न करणे -२,०००
-कचरा निर्मिती करणाऱ्या मोठ्या संस्था, गृहनिर्माण संस्थांनी कचरा वर्गीकरण न केल्यास - १०,०००
-वैद्यकीय हानिकारक कचरा घंडागाडीत टाकणे -१०,०००
-वारंवार वैद्यकीय कचरा घंटागाडीत टाकल्यास संबंधित आस्थापनेला सील लावण्यात येणार.
-बांधकामाचे टाकाऊ साहित्य रस्त्यावर टाकल्यास दररोज दोन हजार रुपये दंड.
-तीन दिवसांपेक्षा जास्त दिवस बांधकामाचे टाकाऊ साहित्य रस्त्यावर टाकल्यास दंड आकारून जप्ती.