रसायनशास्त्र विभागात ‘सीईटी’ला १,०५६ विद्यार्थी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 7, 2019 11:20 PM2019-06-07T23:20:12+5:302019-06-07T23:20:24+5:30
रसायनशास्त्र विभागाच्या प्रवेशपूर्व ‘सीईटी’ शुक्रवारी (दि.७) घेण्यात आली. ९४ जागांसाठी तब्बल १ हजार ५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली.
औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील रसायनशास्त्र विभागाच्या प्रवेशपूर्व ‘सीईटी’ शुक्रवारी (दि.७) घेण्यात आली. ९४ जागांसाठी तब्बल १ हजार ५६ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिल्याची माहिती विभागप्रमुख कॅप्टन डॉ. सुरेश गायकवाड यांनी दिली.
विद्यापीठातील विविध १५ विभागांतील ४० कक्षांत दुपारी १२ ते २ यादरम्यान ही परीक्षा घेण्यात आली. परीक्षेसाठी डॉ. अंजली राजभोज, डॉ. मच्छिंद्र लांडे, डॉ. सुनील शंकरवार, डॉ. गिरीबाल बोंदले, डॉ. बापू शिंगटे, डॉ. भास्कर साठे, प्रा. अनसूया चव्हाण यांच्यासह कर्मचारी, संशोधक विद्यार्थी यांनी परिश्रम घेतले.