शहरात २४ तासांत १०.८ मि.मी. पाऊस
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 12, 2021 04:02 AM2021-07-12T04:02:22+5:302021-07-12T04:02:22+5:30
३७ कोविड निगेटिव्ह रुग्णांवर सुरू उपचार औरंगाबाद : कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह असलेल्या ३७ रुग्णांवर सध्या घाटीत उपचार सुरू आहेत. ...
३७ कोविड निगेटिव्ह रुग्णांवर सुरू उपचार
औरंगाबाद : कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह असलेल्या ३७ रुग्णांवर सध्या घाटीत उपचार सुरू आहेत. कोरोनाचा अहवाल निगेटिव्ह असला तर प्रकृती खालावल्याने या रुग्णांना रुग्णालयात भरती करावे लागले. अनेकांमध्ये कोरोनाप्रमाणे लक्षणे आहेत.
अशोक शिरसाट सेवानिवृत्त
औरंगाबाद : एसटी महामंडळाच्या विभाग नियंत्रक कार्यालयातील लघुटंकलेखक अशोक शिरसाट ३२ वर्षांच्या सेवेनंतर नुकतेच सेवानिवृत्त झाले आहे. यानिमित्त आयोजित कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी विभाग नियंत्रक अरुण सिया होते. याप्रसंगी वरिष्ठ सुरक्षा व दक्षता अधिकारी माणिकराव केंजळे, कामगार अधिकारी बाळासाहेब एकशिंगे, उषा मेहेत्रे, किशोर बत्तीसे, आदी उपस्थित होते. लिपिक नवनाथ बोडखे यांनी सूत्रसंचालन केले.
मोबाईल प्रयोगशाळेला जागेवरून हलेना
औरंगाबाद : जिल्हा सामान्य रुग्णालयात काही दिवसांपूर्वीच स्पाईस हेल्थच्या माध्यमातून सुरू केलेली आरटीपीसीआर मोबाईल प्रयोगशाळा बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला. परंतु, ही प्रयोगशाळा जिल्हा रुग्णालयातून हलविली जात नसल्याची स्थिती आहे. प्रयोगशाळा अन्यत्र हलविण्याबाबत तिसऱ्यांदा पत्र देण्यात आल्याचे जिल्हा शल्यचिकित्सक डाॅ. एस. व्ही. कुलकर्णी यांनी सांगितले.
घाटीतील लिफ्ट बंद
औरंगाबाद : घाटी रुग्णालयातील मेडिसीन विभागातील लिफ्ट बंद असल्याची परिस्थिती आहे. परिणामी, रुग्ण, नातेवाइकांना गैरसोयीला सामोरे जावे लागत आहे. याकडे घाटी प्रशासनाने लक्ष देऊन वेळीच दुरुस्ती करण्याची मागणी होत आहे.