बीडमध्ये ११ बालके कुपोषित
By Admin | Published: July 14, 2017 12:27 AM2017-07-14T00:27:40+5:302017-07-14T00:29:50+5:30
बीड : जिल्हा रुग्णालयात ११ बालके उपचारार्थ दाखल झाली आहेत.
सोमनाथ खताळ ।
लोकमत न्यूज नेटवर्क
बीड : जिल्हा रुग्णालयात ११ बालके उपचारार्थ दाखल झाली आहेत. दोघांना उपचारानंतर बुधवारी सुटी देण्यात आली आहे. ११ बालकांवर गुरूवारी उपचार सुरु होते. कुपोषित बालके आढळल्याने खळबळ उडाली आहे.
मातेला संतुलित आहार न भेटणे, गरिबी, मोठे कुटुंब, आरोग्याबाबत उदासीनता, जास्त मुले अशा अनेक कारणांमुळे कुपोषित मूल जन्माला येते. आरोग्य विभागाकडून कुपोषण मुक्त करण्यासाठी वेगवेगळ्या उपाययोजना केल्या जातात. जनजागृतीच्या नावाखाली हजारोंचा निधी खर्च होतो; परंतु अद्यापही ग्रामीण भागात आरोग्य विभाग अपेक्षेप्रमाणे न पोहोचल्यानेच कुपोषित बालके जन्माला येत आहेत. नागरिकांना काळजी घेण्यासंदर्भात पुरेपूर माहिती देण्यात आलेली नाही. गरोदरपणात, तसेच मूल जन्माला नंतर त्याची काय काळजी घ्यावी, याचे मार्गदर्शनच मिळत नसल्याची माहिती यानिमित्ताने समोर आली आहे.
जिल्हा रुग्णालयात दाखल असलेल्या नऊ बालकांच्या रक्त, छातीचा एक्स-रे, हृदयाची सोनोग्राफी, टीबी यासारख्या वेगवेगळ्या तपासणी करुन उपचार केले जात आहेत. तसेच त्यांना केळी, शिरा, गूळ-शेंगदाण्याचा लाडू, दूध असा आहार दिला जात असल्याचे बालरोगतज्ज्ञ डॉ. हनुमंत पारखे यांनी सांगितले.