समृद्धीत गेलेल्या जमिनींसाठी ११ कोटी ८३ लाख रुपये मंजूर

By ऑनलाइन लोकमत | Published: February 17, 2023 06:49 AM2023-02-17T06:49:08+5:302023-02-17T06:49:29+5:30

घर आणि गोठ्यांसह एकरी सुमारे एक कोटी रुपये मोबदला मिळणार आहे. 

11 crores 83 lakhs sanctioned for lands that have become prosperous | समृद्धीत गेलेल्या जमिनींसाठी ११ कोटी ८३ लाख रुपये मंजूर

समृद्धीत गेलेल्या जमिनींसाठी ११ कोटी ८३ लाख रुपये मंजूर

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क  
औरंगाबाद : ऑरिक सिटीला समृद्धी महामार्गाची कनेक्टिव्हिटी देण्यासाठी आपली जमीन देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी ११ कोटी ८३ लाख ६४ हजार २७५ रुपये मंजूर करण्यात आले. ९०० मीटर लांबीच्या या जोड रस्त्यासाठी सुमारे साडेचार हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. या जमिनीवरील फळबागा, विहीर, घर आणि गोठ्यांसह एकरी सुमारे एक कोटी रुपये मोबदला मिळणार आहे. 

शासनाने दिलेला आतापर्यंतचा हा सर्वात मोठा मोबदल्याचा दर असून ही रक्कम लवकरच प्रकल्पग्रस्त शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केली जाईल, असे वरिष्ठ सूत्रांनी सांगितले. शेंद्रा औद्योगिक पट्ट्यापासून अवघ्या एक किलोमीटर अंतरावरून समृद्धी महामार्ग जातो. 

एकरी सुमारे एक कोटी रुपये मिळणार
nजयपूर भांबर्डा व बनगाव (ता. औरंगाबाद) येथील शेतकऱ्यांच्या मालकीची सुमारे साडेचार हेक्टर जमीन भूसंपादन करून हा रस्ता करण्याचा निर्णय घेण्यात आला. 
या शेतकऱ्यांनी जमिनीचा योग्य मोबदला मिळाल्याशिवाय भूसंपादन करू देणार नाही, अशी भूमिका 
घेतली होती. 
nउद्योगमंत्री उदय सामंत यांनी या बाबत  महाराष्ट्र इंडस्ट्रीयल टाऊनशिप लिमिटेडला (एमआयटीएल) सूचना दिल्या होत्या. त्यानंतर एमआयटीएलने मोबदल्यासाठी  ११ कोटी ८३ लाख ६४ हजार २७५ रुपये मंजूर केले. या निधीचा धनादेश एमआयटीएलने ८ फेब्रुवारी रोजी एमआयडीसीला दिला आहे.

Web Title: 11 crores 83 lakhs sanctioned for lands that have become prosperous

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.