११ शेतकऱ्यांनाच शेततळ्यांचा लाभ

By Admin | Published: May 23, 2016 11:30 PM2016-05-23T23:30:22+5:302016-05-23T23:34:43+5:30

विलास भोसले ल्ल पाटोदा मागेल त्याला शेततळे योजनेचा तालुक्यात फज्जा उडाला आहे.

11 Farmers benefit only | ११ शेतकऱ्यांनाच शेततळ्यांचा लाभ

११ शेतकऱ्यांनाच शेततळ्यांचा लाभ

googlenewsNext

विलास भोसले ल्ल पाटोदा
मागेल त्याला शेततळे योजनेचा तालुक्यात फज्जा उडाला आहे. केवळ ११ शेततळ्यांची कामे पूर्ण झाली असून ८ तलावांची कामे सुरू आहेत. तालुक्यातील खडकाळ जमिनीत तलाव खोदण्यास किमान दीड लाख रूपये खर्च येतो. शिवाय ताडपत्री टाकली तरच शेततळ्याचा उपयोग होऊ शकतो. त्यामुळे शेतकऱ्यांनी या योजनेकडेच पाठ फिरवली असल्याचे पहावयास मिळते.
गतवर्षी दुष्काळ पाहणी निमित्ताने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तालुका दौऱ्यावर आले होते. सौताडा येथील कार्यक्र मात ‘मागेल त्याला शेततळे’ देण्याचे घोषित केले होते. मात्र, त्यासाठीच्या अनुदानाचा उल्लेख केला नव्हता. काही दिवसानंतर ५९ हजार रूपये अनुदान जाहीर केले.
पाटोदा तालुका बालाघाट आणि पायथ्याशी अशा दोन भूप्रदेशात मोडतो. तालुक्यात ‘बेसाल्ट’ प्रकारचा कडक खडक आहे. काही भाग वगळता सर्वत्र ३ ते ५ फुटांवर खडक लागतो. शेततळ्याची खोली किमान ३ मीटर म्हणजे सुमारे १० फूट घेणे बंधनकारक आहे. अशा अवस्थेत ५० हजार रूपयात तळ्याची निर्मिती होऊच शकत नाही असे चित्र आहे. शिवाय शेततळ्यात पाणी साठून राहण्यासाठी ताडपत्री असणे आवश्यक आहे. ताडपत्री नसल्यास पाणी टिकत नाही.
मार्चमध्ये मंत्री दिलीप कांबळे तालुका दौऱ्यावर आले असता शेतकऱ्यांनी ताडपत्रीची गरज आणि अनुदान वाढीची मागणी नोंदवली होती.
कांबळे यांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून सकारात्मक निर्णय घेऊ असे आश्वासन दिले होते. त्यामूळे शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात अर्ज केले प्रत्यक्षात निर्णय झाला नाही त्यामुळे या योजनेकडे शेतकऱ्यांनी पाठ फिरवली.

Web Title: 11 Farmers benefit only

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.