वाघलखेडा बंधाऱ्याच्या कामात ११ लाखांचा घोटाळा !
By Admin | Published: August 20, 2015 12:26 AM2015-08-20T00:26:14+5:302015-08-20T00:26:14+5:30
जालना : अंबड तालुक्यातील वाघलखेडा येथील बंधाऱ्याच्या कामात तब्ब्ल ११ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे
जालना : अंबड तालुक्यातील वाघलखेडा येथील बंधाऱ्याच्या कामात तब्ब्ल ११ लाख रुपयांचा घोटाळा झाल्याची माहिती मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे सचिव अण्णा सावंत यांनी पत्रकार परिषदेत बुधवारी दिली.
सावंत म्हणाले, २१ डिसेंबर २००६ मध्ये या कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम सुरु झाले. निविदेची मूळ किंमत ११ लाख ४७ हजार ७७२ रुपये होती. जिल्हा परिषदेच्या पाटबंधारे विभागाचे हे काम एका खाजगी मजूर सोसायटीला देण्यात आले होते. सदर कामात सुरुवातीपासून निकृष्ट साहित्याचा वापर तसेच कोणतेही तांत्रिक निकष पाळण्यात आले नाहीत. बंधाऱ्याच्या परिसरातील शेतकरी सुरेश घुगे यांनीही सदर काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे जिल्हा परिषदेच्या अभियंत्यांच्या निदर्शनास आणून दिले होते. मात्र याकडे दुर्लक्ष करण्यात आले. याच बंधाऱ्याचे सुधारित अंदाजपत्रक काढून २१ लाख ८० हजारांचे मंजूर करण्यात आले. सदर कामात भ्रष्टाचार झाल्याची तक्रार माकपने केली होती. यावरुन ४ जुलै २०१५ अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी कोल्हे, कार्यकारी अभियंता माकू, शाखा अभियंता जगताप तसेच ग्रामस्थांच्या उपस्थितीत पंचनामा केला. अहवालानुसार ११,३९,२५६ रुपयांची तफावत आढळून आली. या कामात ९५ बरासची त्रुटी आढळून आली. या बंधाऱ्यामुळे ६० हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्र सिंचनाखाली असते, सावंत यांनी सांगितले. (प्रतिनिधी)