शहरात ११, ग्रामीणमध्ये २६ कोरोनाबाधितांची भर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 19, 2021 04:04 AM2021-09-19T04:04:32+5:302021-09-19T04:04:32+5:30
-- औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा ३० च्यावर पोहचला आहे. शनिवारी ३७ कोरोनाबाधितांची भर पडली असली तरी एकाही ...
--
औरंगाबाद : जिल्ह्यातील कोरोनाबाधितांचा आकडा पुन्हा ३० च्यावर पोहचला आहे. शनिवारी ३७ कोरोनाबाधितांची भर पडली असली तरी एकाही मृत्यूची नोंद नाही.
शहरात १२ सप्टेंबरला १० रुग्णांची वाढ झाली होती. त्यानंतर आठवडाभर रुग्णवाढ दहाच्या आत होती. शनिवारी ११ कोरोनाबाधितांची नोंद झाली, तर ग्रामीण भागात शुक्रवारचा अपवाद वगळता दररोज दोन अंकी आकड्यात बाधितांची वाढ होत आहे. त्यामुळे चिंता व्यक्त करण्यात येत असून गंगापूर आणि वैजापूर तालुक्यातील वाढ सर्वाधिक आहे.
दिवसभरात शहरातील ९ तर ग्रामीण भागातील १८ जणांना सुटी देण्यात आली. आजपर्यंत १ लाख ४४ हजार ७०६ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या १ लक्ष ४८ हजार ४८२ झाली आहे. आतापर्यंत एकूण ३ हजार ५६१ जणांचा मृत्यू झाल्याने एकूण २१५ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे.
---
७३.९४ टक्के सक्रिय रुग्ण ग्रामीणचे
---
जिल्ह्यात २१५ रुग्णांवर सध्या उपचार सुरू असून त्यापैकी ग्रामीण भागातील १५९ रुग्ण आहेत. ७३.९४ टक्के रुग्ण हे ग्रामीण भागातील असून २६.०४ टक्के सक्रिय रुग्ण शहरातील आहे.
--
वैजापूर हाॅटस्पॉट
--
सक्रिय रुग्णांत ८७ रुग्ण एकट्या वैजापूर तालुक्यात आहे. गंगापूर ३१, पैठण २४ तर १२ रुग्ण औरंगाबाद तालुक्यात असून फुलंब्री, कन्नड, खुलताबाद, सिल्लोड येथे प्रत्येकी १, तर सोयगाव तालुक्यात शून्य रुग्ण असल्याचे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.
शहरात ११ रुग्ण
--
मधुमालती नगर १, विद्यानिकेतन कॉलनी १, मुकुंदवाडी पोलीस स्टेशन परिसर १, विनायकनगर २, देवळाई परिसर १, इटखेडा २, अन्य ३
--
ग्रामीण भागात २६
--
औरंगाबाद २, गंगापूर ९, वैजापूर १३, पैठण २ कोरोनाबाधित आढळून आले.
--
रुग्णवाढीचा आलेख
---
दिनांक -एकूण रुग्ण - शहर -ग्रामीण
१२ सप्टेंबर -२९ -१० -१९
१३ सप्टेंबर -२० -५ -१५
१४ सप्टेंबर -२४ -६ -१८
१५ सप्टेंबर-२१ - ४ -१७
१६ सप्टेंबर -१९ -७ -१२
१७ सप्टेंबर -१० -५ -५
१८ सप्टेंबर -३७ -११ -२६