मामा-मावश्याकडून 11 वर्षीय मुलीवर अत्याचार

By ऑनलाइन लोकमत | Published: September 7, 2017 10:20 PM2017-09-07T22:20:38+5:302017-09-07T22:20:48+5:30

आईवडील नसलेल्या सहावीत शिकणा-या बालिकेवर तिचा मामा आणि मावश्यानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी (दि. 7) रोजी एका शिक्षकेमुळे उघडकीस आली.

11-year-old girl raped by a mother-in-law | मामा-मावश्याकडून 11 वर्षीय मुलीवर अत्याचार

मामा-मावश्याकडून 11 वर्षीय मुलीवर अत्याचार

googlenewsNext

औरंगाबाद, दि. 7 - आईवडील नसलेल्या सहावीत शिकणा-या बालिकेवर तिचा मामा आणि मावश्यानेच अत्याचार केल्याची खळबळजनक घटना गुरूवारी (दि. 7) रोजी एका शिक्षकेमुळे उघडकीस आली. याप्रकरणी मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात आरोपींविरुद्ध बलात्काराचा गुन्हा नोंदविण्यात आला असून पोलिसांनी आरोपींना अटक केली.

मावसकाका सुधीर सुरडकर आणि मामा संतोष जुमडे (रा. मुकुंदवाडी)अशी आरोपींची नावे आहे. याविषयी मुकुंदवाडी पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, 11 वर्षीय पीडितेचे आई-वडिल मृत झालेले आहे. यामुळे तिचा सांभाळ मुकुंदवाडी येथे राहणारी तिची मावशी आणि मावसकाका आरोपी सुधीर सुरडकर हे करतात.

दोन ते तीन वर्षापासून आरोपी संतोष हा सुद्धा मुकुंदवाडीत राहणा-या सुरडकर याच्याघरीच राहतो. तो सेक्युरीटी गार्डचे काम करतो. पीडितेची मावशी ही एका खासगी रुग्णालयात सफाईगार म्हणून काम करते. आरोपी मावशा हा घरीच राहतो. दोन्ही आरोपींना दारूचे व्यसन जडलेले आहे. पीडितेकडून ते घरीची धुणीभांडी करून घेतात. तिने काम न केल्यास तिला ते उपाशी ठेवतात.

भीक मागून आण असे म्हणतात. वर्षभरापासून अनेकदा दोन्ही आरोपींनी दारूच्या नशेत तिच्यावर अत्याचार केले. एवढेच नव्हे तर या अत्याचाराची कोठेही वाच्यता केल्यास तुला घराबाहेर हाकलून देऊ अशी, धमकी त्यांनी तिला दिली होती. ही बाब काही दिवसापूर्वी तिने तिच्या मावशीला सांगितली, मात्र मावशीने तिच्याकडे दुुर्लक्ष करीत, याची कोठेही वाच्यता करू नको,असे बजावले. परिणामी दोन दिवसापूर्वीच आरोपीने तिच्यावर अत्याचार केला.
शिक्षकेनेने कळविले पोलिसांना
आज दुपारी शाळा सुटल्यानंतर सर्व विद्यार्थी घरी जाऊ लागले, मात्र पीडिता ही वर्गातच बसून रडत होती. यावेळी शिक्षिकेने तिला काय झाले विचारले असता, ती घरी जाणार नाही, शाळेतच राहणार असल्याचे त्यांना सांगितले. यावेळी अन्य शिक्षिकाही तिला भेटल्या आणि तिला त्यांनी काय झाले याविषयी सविस्तर विचारले असता आरोपी मामा आणि मावसकाकाने केलेल्या अत्याचाराचा पाढाच त्यांच्यासमोर वाचला. यानंतर शिक्षिकांनी या घटनेची माहिती तात्काळ मुकुंदवाडी पोलिसांना कळविली. पोलिसांनी याप्रकरणी आरोपींविरूद्ध गुन्हा नोंदवून आरोपींना अटक केली. आरोपींना पाठीशी घातल्याप्रकरणी पीडितेच्या मावशीला आरोपी बनविले आहे.

Web Title: 11-year-old girl raped by a mother-in-law

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.