११०० रोहित्रांची दुरुस्ती; तरीही समस्या कायमच

By Admin | Published: January 31, 2017 12:20 AM2017-01-31T00:20:30+5:302017-01-31T00:21:00+5:30

बीड बिघाडाचे प्रमाण अधिक असल्याने आजही रोहित्रांची समस्या जाणवत आहे.

1100 Rohithar repairs; Still the problem is always | ११०० रोहित्रांची दुरुस्ती; तरीही समस्या कायमच

११०० रोहित्रांची दुरुस्ती; तरीही समस्या कायमच

googlenewsNext

राजेश खराडे बीड
रबी हंगामात कृषिपंपांना सुरळीत वीज पुरवठा व्हावा याकरिता महावितरणने बीड विभागात गेल्या सहा महिन्यांत तब्बल ११५० रोहित्रांची दुरुस्ती केली आहे. असे असूनदेखील बिघाडाचे प्रमाण अधिक असल्याने आजही रोहित्रांची समस्या जाणवत आहे. रोहित्रांच्या गैरवापराचा परिणाम महावितरणच्या यंत्रणेबरोबरच शेतकऱ्यांच्या पिकावर झाला आहे.
बीड विभागात ६ उपविभाग असून, केवळ बीड अर्बन वगळता इतर उपविभागांमध्ये रोहित्र बिघाडांची संख्या १०० वर गेली होती. रबी हंगाम सुरू होता पिकांना पाणी देण्याची प्रक्रिया सुरू झाली होती. मुबलक पाणी साठा असल्याने शेतकऱ्यांनी अधिकच्या कृषिपंपांचा वापर केल्याने रोहित्रांमधील बिघाड हे नित्याचेच झाले होते. १०० केव्ही रोहित्रावर ५० ते ६० कृषिपंप कार्यरत होऊ शकतात. मात्र, सरासरीपेक्षा दुपटीने त्याचा वापर होत होता. दिवसाकाठी ८ ते १० रोहित्रांमध्ये बिघाड होत असून, संबंधित एजन्सीकडून केवळ २-३ रोहित्रांची दुरुस्ती करून मिळत असे. दुरुस्ती व पुरवठ्यामधील तफावत हंगाम संपला तरी महावितरणला देखील भरून काढता आली नाही. शिवाय, शेतकऱ्यांनीही रोहित्रांचा आवश्यक तेवढाच वापर केला नाही.
रोहित्रांची कमतरता असल्याने बीड विभागाने रत्नागिरी, पुणे, कराड, तुळजापूर, धुळे आदी विभागांकडून ६३ व १०० केव्हीएचे रोहित्र मागविले होते. शिवाय वरिष्ठ कार्यालयाकडून नियमितपणे १५५ रोहित्रांचा पुरवठा झाला होता. बीड ग्रामीण व गेवराई उपविभागात सर्वांत कमी वसुली असूनदेखील रोहित्र बिघाडाचे प्रमाण सर्वाधिक होते. रोहित्रांसाठी अनेक वेळा शेतकऱ्यांनी मोर्चे, आंदोलने, उपोषणे केली होती. मात्र, अधिकाऱ्यांच्या सुसंवादामुळे रबी हंगाम सद्य:स्थितीत अंतिम टप्प्यात आहे. वरिष्ठ अधिकाऱ्यांनी रोहित्र वापराबाबत सातत्याने जनजागृती करीत इतर विभागांतून मदतही मागितली असल्याचे कार्यकारी अभियंता जी.बी. घोडके यांनी सांगितले.

Web Title: 1100 Rohithar repairs; Still the problem is always

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.