मराठवाड्यात चारा छावण्यांसाठी १११ कोटी रुपयांचे अनुदान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 7, 2019 05:27 PM2019-05-07T17:27:56+5:302019-05-07T17:28:27+5:30
अनुदानात १०३ कोटी रुपये एकट्या बीड जिल्ह्यासाठी देण्यात आले आहेत.
औरंगाबाद : मराठवाड्यात सुरू केलेल्या ६९४ चारा छावण्यांसाठी सुरू असलेली अनुदानाची मागणी पूर्ण झाली आहे. विभागातील औरंगाबाद, जालना, बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यांत सुरू असलेल्या चारा छावण्यांसाठी १११ कोटी ८७ लाख रुपये प्रशासनाला देण्यात आले आहेत.
७५ टक्के रक्कम उपयोगिता प्रमाणपत्र प्राप्त झाल्यानंतरच अनुदान मागणी करता येणार आहे. अनुदानात १०३ कोटी रुपये एकट्या बीड जिल्ह्यासाठी देण्यात आले आहेत. यात छावण्यांमध्ये चारा, पाणी, औषधे यांचा पुरवठा आणि छावण्यांपर्यंत चाऱ्याचा वाहतूक खर्चाचा समावेश आहे. छावणी प्रायोजक संस्थेला अनुदान थेट वितरित करण्यात येणार आहे. पावसाळ्यासाठी महिनाभर शिल्लक असून, सध्या चारा उपलब्ध नसल्याने छावण्यांमध्ये जनावरांच्या संख्येतही वाढ होत आहे.
चारा छावण्यांसाठी देण्यात येणारे अनुदान
औरंगाबाद - ५९ लाख ७९ हजार ९०५
जालना - ६ लाख ४२ हजार ३४८
बीड - १०३ कोटी १८ लाख १० हजार
उस्मानाबाद - ८ कोटी २ लाख ८८ हजार
एकूण - १११ कोटी ८७ लाख २१ हजार