११३५ गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी
By Admin | Published: November 14, 2014 12:24 AM2014-11-14T00:24:50+5:302014-11-14T00:54:43+5:30
बीड : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरु आहेत़ जिल्ह्यात ११३५ गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आहे़
बीड : दुष्काळी परिस्थितीवर मात करण्यासाठी योग्य त्या उपाययोजना सुरु आहेत़ जिल्ह्यात ११३५ गावांची आणेवारी ५० पेक्षा कमी आहे़ त्यामुळे या गावांना योग्य ते लाभ मिळतील, असे ग्रामविकास, जलसंधारण तथा महिला व बालविकास मंत्री पंकजा मुुंडे यांनी सांगितले़
गुरुवारी त्यांनी येथे पत्रकार परिषद घेतली़ यावेळी त्यांनी सांगितले की, दुष्काळाच्या खाईतून शेतकऱ्यांना बाहेर काढण्यासाठी प्रभावी उपायोजना सुरु आहेत़ जिल्ह्यात जलसंधारणाची कामे मोठ्या प्रमाणात केली जाणार आहेत़ ऊसतोड मजुरांच्या मुलांना चांगल्या दर्जाचे शिक्षण मिळावे, मजुरांना स्थानिक पातळीवर रोजगार उपलब्ध व्हावा, यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्यांनी सांगितले़
पंतप्रधान ग्रामसडक योजनेतून केवळ २५० लोकसंख्या असलेल्या वस्तीला रस्ता मिळतो;पण आता जिथे वस्ती तिथे रस्ता करण्यासाठी प्रयत्न केले जातील, असेही त्या म्हणाल्या़ जिल्ह्याच्या जिव्हाळ्याचा रेल्वेप्रश्न मार्गी लावण्यासाठी पाठपुरावा सुरु आहे़ हा प्रश्न सुटत नाही तोपर्यंत पाठपुरावा सोडणार नाही, असेही त्यांनी सांगितले़ मिनीमम सत्कार व मॅक्झिमम परफॉर्मस्वर आपला भर राहील, असेही पंकजा म्हणाल्या़ (प्रतिनिधी)