शहराच्या पाणीपुरवठ्यावर वर्षाला ११४ कोटींचा खर्च

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 25, 2021 04:05 AM2021-01-25T04:05:51+5:302021-01-25T04:05:51+5:30

मुजीब देवणीकर औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी महापालिकेला तब्बल ११४ कोटी रुपये खर्च करावे लागतात. पाणीपट्टी वसुलीतून ...

114 crore per annum on water supply in the city | शहराच्या पाणीपुरवठ्यावर वर्षाला ११४ कोटींचा खर्च

शहराच्या पाणीपुरवठ्यावर वर्षाला ११४ कोटींचा खर्च

googlenewsNext

मुजीब देवणीकर

औरंगाबाद : ऐतिहासिक औरंगाबाद शहराच्या पाणीपुरवठ्यावर दरवर्षी महापालिकेला तब्बल ११४ कोटी रुपये खर्च करावे लागतात. पाणीपट्टी वसुलीतून ४० कोटी रुपये प्राप्त होतात. दरवर्षी प्रशासनाला जवळपास ७४ कोटी रुपयांची तूट सहन करावी लागते. पाणीपुरवठ्यावर जेवढा खर्च करावा लागतो त्यातील ५० टक्के रक्कम वीजबिलाची आहे. अनधिकृत नळांची संख्या दिवसेंदिवस वाढत असल्याने पालिकेला मोठा तोटा सहन करावा लागत आहे.

६० किलोमीटर अंतरावर दोन ठिकाणी पाणी लिफ्ट करून शहरात आणावे लागते. दर महिन्याला साडेचार कोटी रुपये वीजबिलाचे भरावे लागतात. ५५ ते ६० कोटी रुपये वीजबिलावर तर जायकवाडी, मुख्य जलवाहिनी, अंतर्गत जलवाहिन्यांची दुरुस्तीवर १५ कोटी, लिकेजसाठी ३० लाख, पाणी शुद्धीकरणासाठी २ कोटींची रसायन खरेदी, विद्युत पंप दुरुस्ती १ कोटी, केबल जळणे २५ लाख आदी प्रत्येक कामासाठी पाण्यासारखा पैसा खर्च करावा लागतो. शहराची गरज २०० एमएलडीची असताना १२० एमएलडी पाणीपुरवठा करण्यात येतो.

अर्धा टक्के गळती

जायकवाडी आणि शहरात दररोज दुरुस्तीचे काम महापालिकेकडून करण्यात येते. अनेक ठिकाणी व्हाॅल्व मधून ५ टक्के गळती होते. वॉटर ऑडिटनुसार अनधिकृत नळ कनेक्शनची संख्या गृहीत धरून ४० टक्के गळतीचे प्रमाण धरण्यात येते. अनधिकृत नळ कनेक्शन महापालिकेसाठी मोठी डोकेदुखी ठरत आहे.

११४

कोटींचे पाणीपुरवठ्याचे वार्षिक बजेट

५५ ते ६०

कोटी दरवर्षी पाणीपुरवठ्याच्या विजेचे बिल

१६०

कर्मचारी पाणीपुरवठा विभागात कार्यरत

कालबाह्य यंत्रणेमुळे खर्चात वाढ

शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या दोन योजना आहेत. दोन्ही योजनांचे आयुष्य यापूर्वीच संपलेले आहे. ठिकठिकाणी गळती त्यानंतर लगेच दुरुस्ती करून योजना कशीबशी सुरू आहे. नवीन पाणीपुरवठा योजना कार्यान्वित होईपर्यंत जुने योजना चालण्याशिवाय गत्यंतर नाही.

किरण धांडे, प्रभारी कार्यकारी अभियंता.

बीड बायपास

बीड बायपास रोडवर अनेक वर्षांपासून या व्हाॅल्वमधून पाण्याची गळती होते. महापालिकेने अनेकदा दुरुस्ती केली. नागरिक पुन्हा लिकेज निर्माण करतात. ज्या ठिकाणी गळती आहे, तेथे लोखंडी जाळी बसविली होती, पण त्याचाही काहीच उपयोग झाला नाही.

रेल्वेस्टेशन

रेल्वेस्टेशन गेट क्रमांक दोन जवळ महापालिकेच्या दोन जलवाहिन्या आहेत. दोन्ही जलवाहिन्यांना व्हाॅल्व बसविण्यात आलेले आहेत. किंचित स्वरूपात पाण्याची गळती याठिकाणी वर्षानुवर्षे सुरू आहे.

अयोध्या नगरी

रेल्वेस्टेशनहून बाबा पेट्रोलपंपाकडे येत असताना डावीकडे अयोध्यानगरी येथे अनेक वर्षांपासून पाण्याची गळती सुरू आहे. महापालिकेने अनेकदा दुरुस्ती केली, पण त्याचा काहीच उपयोग झाला नाही.

Web Title: 114 crore per annum on water supply in the city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.