११७ कोटी जिल्हा बँकेकडे वितरित
By Admin | Published: February 17, 2016 11:42 PM2016-02-17T23:42:50+5:302016-02-17T23:47:13+5:30
नांदेड :दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या १७५ कोटी रुपयांपैकी ११७ कोटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत.
नांदेड :दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक धीर देण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झालेल्या १७५ कोटी रुपयांपैकी ११७ कोटी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेकडे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र तालुकानिहाय शेतकऱ्यांच्या याद्याच बँकेकडे प्राप्त झाल्या नसल्याने अद्यापही मदतीची प्रतीक्षा आहे. जिल्हा प्रशासनाने सर्व दुष्काळाची १७५ कोटी रक्कम तालुक्यांना वितरित केली आहे.
गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे जिल्ह्यातील बळीराजाच्या हातात खरिपाचे पीक लागले नाही. त्यांनी खत-बियाणसाठी टाकलेला खर्चही त्यातून निघाला नाही. त्यामुळे शेतकरी पूरता कंगाल झाला आहे. त्यानंतरही पाऊसच नसल्याने रबीची पेरणीही अत्यल्प झाली. मात्र तेही पीक पाण्याअभावी हाती लागणे कठीण आहे. या सर्व संकटाचा सामना करीत असताना त्यांना दुष्काळात आधार मिळावा, यासाठी शासनाकडून अर्थिक मदत क रण्यात येत आहे. दुष्काळाचा निधी उपलब्ध होऊनही तालुक्याच्या ठिकाणाहून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या अर्धवट याद्या जिल्हा बँकेकडे सुपूर्द केल्यामुळे दुष्काळ वाटपाच्या कामात अडथळे येत आहेत. त्यासाठी तहसील कार्यालयाकडून परिपूर्ण याद्यासह खातेनंबर जिल्हा बँककेडे सुपूर्द करणे आवश्यक आहे़ (प्रतिनिधी)