११ वी प्रवेशासाठी सप्टेंबर उजाडणार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 13, 2018 01:14 AM2018-08-13T01:14:14+5:302018-08-13T01:14:35+5:30
अकरावी प्रवेशाचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच कोलमडले आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये तब्बल चार वेळा बदल झाला. आता सुधारित वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबरपर्यंत पाचवी प्रवेश फेरी चालणार आहे. या फेरीनंतर रिक्त जागांवर स्पॉट अॅडमिशन देण्यात येणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपण्यास सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : अकरावी प्रवेशाचे नियोजन पहिल्या दिवसापासूनच कोलमडले आहे. नियोजित वेळापत्रकामध्ये तब्बल चार वेळा बदल झाला. आता सुधारित वेळापत्रकानुसार २१ सप्टेंबरपर्यंत पाचवी प्रवेश फेरी चालणार आहे. या फेरीनंतर रिक्त जागांवर स्पॉट अॅडमिशन देण्यात येणार आहे. अकरावीची प्रवेश प्रक्रिया संपण्यास सप्टेंबर उजाडणार असल्याचे स्पष्ट झाले आहे.
नियोजित वेळापत्रकानुसार ३१ जुलै रोजी ही प्रवेश प्रक्रिया संपणार होती. मात्र मुंबई, नागपूरमध्ये झालेल्या पावसामुळे सुरुवातीला वेळापत्रक बदलावे लागले. अल्पसंख्याक महाविद्यालयांतील प्रवेश प्रक्रियेवरून नागपूर खंडपीठाने दिलेल्या आदेशामुळे यानंतर दोनदा बदल झाले. या गोंधळामुळे तब्बल महिनाभर विलंबाने प्रवेश प्रक्रिया संपणार आहे. चौथ्या फेरीत ३ हजार ६९४ विद्यार्थ्यांना अलॉटमेंट दिली होती. या विद्यार्थ्यांना १० आॅगस्टपर्यंत प्रवेश घेणे बंधनकारक होते. मात्र ही फेरी संपल्यानंतर रिक्त जागांची आकडेवारी १३ आॅगस्ट रोजी जाहीर होणार आहे. तसेच चौथ्या फेरीत अलॉटमेंट केलेल्या जागा सोडूनही ११ हजार ६०८ जागा रिक्त आहेत. त्यामुळे १३ व १४ आॅगस्ट रोजी पाचव्या विशेष फेरीसाठी आॅनलाईन नोंदणी करावी लागणार आहे. यानंतर १८ आॅगस्ट रोजी या फेरीतील विद्यार्थ्यांची अलॉटमेंट जाहीर होईल. या फेरीतील विद्यार्थ्यांना १८ ते २१ आॅगस्टदरम्यान प्रवेश घ्यावे लागतील. या फेरीनंतरही रिक्त जागांवर तेथून पुढे स्पॉट अॅडमिशन देता येणार आहेत. यामुळे सप्टेंबरपर्यंत ही प्रवेश प्रक्रिया सुरू राहील, असे महाविद्यालयांच्या प्राचार्यांनी स्पष्ट केले.