जिल्ह्यात १२१ महिला झाल्या सरपंच
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 10, 2017 12:14 AM2017-10-10T00:14:17+5:302017-10-10T00:14:17+5:30
जिल्ह्यातील एकूण २०१ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, यात १२१ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच निवडून आल्या आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : जिल्ह्यातील एकूण २०१ ग्रामपंचायत निवडणुकांचा निकाल सोमवारी जाहीर झाला असून, यात १२१ ग्रामपंचायतींवर महिला सरपंच निवडून आल्या आहेत. जिल्ह्यात एकूण २१५ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर झाल्या होत्या. ७ आॅक्टोबर रोजी २०१ ग्रामपंचायतींच्या निवडणुका होऊन सोमवारी निकाल जाहीर झाले. १४ ग्रामपंचायतींचा निकाल यापूर्वीच लागला. २१५ पैकी भाजपने १०३ ग्रामपंचायतींवर तर शिवसेनेने ८७ ग्रामपंचायतींवर दावा केला आहे.
यंदा प्रथमच जनतेतून सरपंचपदाची निवड होणार असल्याने सर्वच ठिकाणी निवडणुका चुरशीच्या झाल्या. यात अनेकांची प्रतिष्ठा पणाला लागली. आज निकाल जाहीर होताच, कही खुशी, कही गम अशी परिस्थिती निर्माण झाली.
खुलताबाद तालुक्यातील दहापैकी ५ ग्रामपंचायतींवर भाजप समर्थकांनी, एका ग्रा.पं.वर राष्ट्रवादीने दावा केला असून, एका ठिकाणी अपक्ष तर उर्वरित ठिकाणी इतरांनी सरपंचपद मिळविले आहे. खुलताबाद तालुक्यात ७ ठिकाणी महिला सरपंच झाल्या.
गंगापूर तालुक्यातील ३३ पैकी १७ ठिकाणी महिला सरपंच विजयी झाल्या. भोयगावात सरपंच ज्योती सतीश डेडवाल यांनी सर्वाधिक मते घेतली.
कन्नड तालुक्यातील ४५ पैकी २९ ठिकाणी महिलाराज आले आहे. या निवडणुकीत कृउबा समितीचे सभापती राजेंद्र मगर, माजी उपसभापती गणेश शिंदे, पं.स.च्या माजी सभापती हर्षली मुठ्ठे, गोकुळसिंग राजपूत, शिवसेना तालुकाप्रमुख केतन काजे यांना आपल्याच गावातील मतदारांनी धक्के दिले,