महाज्योतीच्या फेलोशिपसाठी १२२६ संशोधक पात्र, पण मंजुर दिनांक १ नोव्हेंबर केल्याने नाराजी
By योगेश पायघन | Published: November 2, 2022 06:50 PM2022-11-02T18:50:40+5:302022-11-02T18:52:22+5:30
पीएचडी संशोधक अधिछात्रवृत्ती तात्पुरती निवड यादी जाहीर
औरंगाबाद ः महात्मा ज्योतिबा फुले संशोधन अधिछात्रवृत्तीसाठी १५३९ अर्ज प्राप्त झालेले होते. प्राप्त झालेल्या अर्जाची व मूळ कागदपत्रांची तपासणी महाज्योतीकडून नागपुर येथे १ ते ९ सप्टेंबर रोजी झाली. त्यात १२२६ अर्ज पात्र ठरवण्यात आले. त्यांची तात्पुरती निवड यादी बुधवारी जाहीर झाली. फेलोशिपच्या प्रतिक्षेतील विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला असला तरी मंजुर दिनांक १ नोव्हेंबर केल्याने विद्यार्थ्यांत नाराजीचा सुर आहे.
महाज्योतीच्या संचालक मंडळाच्या १ नोव्हेंबर रोजी झालेल्या बैठकीत १२२६ पात्र उमेदवारांना १ नोव्हेंबर २०२२ या या मंजूर दिनांकापासून अधिछात्रवृत्ती (प्रथम दोन वर्षे ३१,००० रूपये सोबक एचआरए व आकस्मिक खर्च, त्यापुढील तीन वर्षे ३५,०००रुपयांसोबत एचआरए व आकस्मिक खर्च देण्याचा निर्णय घेण्यात आलेला आहे. ज्या उमेदवारांची तात्पुरती निवड झालेल्या उमेदवारांनी महाज्योती, नागपूरच्या पीएचडी एमआयएस मध्ये पीएच.डी अभ्यासक्रम सुरु असल्याबाबत प्रमाणपत्र एमआयएस प्रणालीत अपलोड करून अधिछात्रवृत्ती विभाग प्रकल्प व्यवस्थापक नागपूर यांच्याकडे २२ नोव्हेंबर पर्यंत रजिस्टर पोस्ट, स्पीड पोस्ट ने पाठवावे. कालावधीत प्रमाणपत्र सदर न करणाऱ्या उमेदवारांचा अधिछात्रवृत्ती देण्यात येणार नाही. असे व्यवस्थापकीय संचालकांनी परिपत्रकात म्हटले आहे.
आक्षेप पुराव्यासह मेल करा
उमेदवारांनी प्रमाणपत्र सादर केल्यावर या कार्यालयामार्फत पडताळणी करण्यात येईल. ज्या उमेदवारांचे वर नमूद प्रमाणपत्र योग्य आढळून येईल अशा उमेदवारास एमआयएस द्वारेच अधिछात्रवृत्ती प्रदान पत्र डाऊनलोड करता येईल. यादीबाबत काही आक्षेप असल्यास या कार्यालयाच्या mahajyotifellowship२०२२@gmail.com या मेलवर पुराव्यासहित सादर करावेत. असे आवाहन महाज्योती कार्यालयाकडून करण्यात आले आहे.