दिवसभरात १२५ कोटींची उलाढाल ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2021 04:02 AM2021-03-14T04:02:11+5:302021-03-14T04:02:11+5:30

जुन्या मोंढ्यातही १२० पूर्ण दुकाने बंद राहिली. जाधववाडी व जुना मोंढा मिळून १० ते १२ कोटींची उलाढाल ठप्प होती. ...

125 crore turnover during the day | दिवसभरात १२५ कोटींची उलाढाल ठप्प

दिवसभरात १२५ कोटींची उलाढाल ठप्प

googlenewsNext

जुन्या मोंढ्यातही १२० पूर्ण दुकाने बंद राहिली. जाधववाडी व जुना मोंढा मिळून १० ते १२ कोटींची उलाढाल ठप्प होती. याशिवाय शहरात गुलमंडी, टिळकपथ, पैठणगेट, औरंगपुरा, निरालाबाजार, कुंभारवाडा, मच्छलीखडक, सिटीचौक, सराफा बाजार, शहागंज या मध्यवर्ती बाजारातही लॉकडाऊनचे काटेकोर पालन करण्यात आले. अशीच परिस्थिती जवाहर कॉलनी, सूतगिरणी परिसर, पुंडलिकनगर, शिवजीनगर, सिडको कॅनॉट प्लेस, हडको या भागात दिसून आली. काही औषधी दुकाने सुरू तर काही बंद होती. काही तुरळक किराणा दुकान सुरू होत्या. पण ग्राहकच नसल्याने अनेकांनी दुपारनंतर दुकान बंद केले होते. शहरात दिवसभरात जवळपास १२५ कोटींची उलाढाल ठप्प राहिली, अशी माहिती मराठवाडा चेंबरचे अध्यक्ष प्रफुल मालानी यांनी दिली.

चौकट

बीडबायपासवर लॉकडाऊनचा परिणाम

बीडबायपासच्या दोन्ही बाजूंनी मोठी बाजारपेठ निर्माण झाली आहे. येथे लहान मोठी शेकडो दुकाने आहेत. शनिवारी संपूर्ण दुकाना बंद होत्या. रस्त्यावर ट्रक, टेम्पोशिवाय दुसरे वाहन दिसत नव्हते.

प्रफुल्ल मालानी, अध्यक्ष, मराठवाडा चेंबर

Web Title: 125 crore turnover during the day

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.