१२५ कोटी नव्हे तब्बल २१२ कोटींच्या रस्त्यांची यादी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2019 10:52 PM2019-06-04T22:52:23+5:302019-06-04T22:52:50+5:30
शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील पदाधिकारी व आयुक्तांनी सहा महिन्यांनंतर १२५ नव्हे तर तब्बल २१२ कोटी ५५ लाख रुपये रकमेच्या ५७ रस्त्यांचा प्रस्ताव अंतिम केला आहे. १३ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार असून, नंतर सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी राज्य शासनाने महापालिकेला १२५ कोटींचा निधी देण्याची घोषणा केली आहे. महापालिकेतील पदाधिकारी व आयुक्तांनी सहा महिन्यांनंतर १२५ नव्हे तर तब्बल २१२ कोटी ५५ लाख रुपये रकमेच्या ५७ रस्त्यांचा प्रस्ताव अंतिम केला आहे. १३ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत हा प्रस्ताव मंजुरीसाठी मांडला जाणार असून, नंतर सरकारकडे मंजुरीसाठी पाठविला जाणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.
महापौर नंदकुमार घोडेले यांनी ७९ रस्त्यांची यादी अंतिम करून आयुक्त डॉ. निपुण विनायक यांच्याकडे सुपूर्द केली होती. मागील दीड-दोन महिन्यांत आयुक्तांनी यादीतील प्रत्येक रस्त्याची पाहणी केली. यादीला कात्री लावत ७९ वरून ५७ वर आणली. या ५७ रस्त्यांच्या व्हाईट टॉपिंगच्या कामासाठी २१२ कोटी ५५ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. हा प्रस्ताव अंतिम करून तो आता १३ जून रोजीच्या सर्वसाधारण सभेत मंजुरीसाठी ठेवण्यात येत असल्याचे सूत्रांनी सांगितले.
शहरातील ५७ रस्ते
नौबत दरवाजा ते सिटीचौक
पाणचक्की येथे पूल बांधणे
मकईगेट येथे पूल बांधणे
देना बँक-औरंगपुरा ते सुराणा कॉम्प्लेक्स
चांदणे चौक ते डॉ. सलीम अली सरोवर
गांधी पुतळा-सिटीचौक ते हेड पोस्ट आॅफिस
वरद गणेश मंदिर-सावरकर चौक ते सिल्लेखाना
संस्थान गणपती-नवाबपुरा ते जाफरगेट मोंढानाका
बळवंत वाचनालय-बाराभाई ताजिया ते शनी मंदिर
गांधी पुतळा-किराणा चावडी ते अभिनय टॉकीज
पटेल हॉटेल ते रोशनगेट
रोशनगेट ते कटकटगेट
पोलीस मेस ते कटकटगेट
गुलशन महाल-जिन्सी चौक ते जालना रोड
मदनी चौक ते मध्यवर्ती जकात नाका
हर्सूल जेल ते स्मृतीवन
हरसिद्धी माता मंदिर ते नवीन वसाहत-डांबरीकरण
गांधी पुतळा ते शिवाजी महाराज पुराणवस्तू संग्रहालय
हर्सूल टी पॉइंट ते कलावती लॉन्स (जाधववाडी सर्व्हिस रोड)
एसबीओए शाळा ते कलावती लॉन्स (सर्व्हिस रोड)
भगतसिंगनगर ते पिसादेवी रोड-डांबरीकरण
अण्णाभाऊ साठे चौक ते शहागंज चमन
वोखार्ड कंपनी ते जयभवानी चौक-नारेगाव
गरवारे स्टॉप ते त्रिदेवता मंदिर सिडको
आविष्कार चौक माता मंदिर
आविष्कार चौक ते भोला पानसेंटर सिडको
ग्रीव्हज कॉटन एमआयडीसी ते अनिल केमिकल-जयभवानी चौक
धूत हॉस्पिटल ते मसनतपूर-शहानगर
दीपाली हॉटेल-जयभवानी चौक ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन
वंजारी मंगल कार्यालय ते नागरे यांचे घर
भवानी पेट्रोल पंप ते सी-सेक्टर मेन रोड सिडको
महालक्ष्मी चौक ते लोकशाही कॉलनी
अग्रेसन भवन ते सेंट्रल एक्साईज आॅफिस
आकाशवाणी-त्रिमूर्ती चौक ते गजानन महाराज-चेतक घोडा चौक
जालना रोड ते अॅपेक्स हॉस्पिटल
रामायणा हॉल ते उल्कानगरी-विभागीय क्रीडा संकुल
अग्निहोत्र चौक ते रिद्धीसिद्धी-विवेकानंद चौक
जवाहर कॉलनी पोलीस स्टेशन ते सावरकर चौक
कॅनॉट प्लेसअंतर्गत रस्त्यांची कामे
जळगाव रोड ते अजंता अॅम्बेसिडर हॉटेल
राज हाईटस् एमजीएम ते एन-५ जलकुंभ सिडको
शंभूनगर ते गादिया विहार
आय्यप्पा मंदिर रोड या रस्त्याचे काम
आमदार रोड सातारा या रस्त्याचे काम
एमआयटी कॉलेज ते खंडोबा मंदिर
शिवमंदिर ते चौसरनगर
एमआयडीसी ते एमआयडीसी आॅफिस ते वाल्मीकी चौक
कामगार चौक-पीरबाजार ते आनंद गाडे चौक-देवगिरी कॉलेज
गोपाल टी ते गुरुद्वारा-पीरबाजार
सिल्लेखाना ते लक्ष्मण चावडी
लक्ष्मण चावडी ते कैलासनगर
अमरप्रीत हॉटेल ते एकता चौक
संत एकनाथ रंगमंदिर ते गुरुतेग बहादूर स्कूल
आनंद गाडे चौक ते वाल्मीकी चौक
मुकुंदवाडी शाळा ते स्मशानभूमी आडवा रस्ता
चिकलठाणा न्यू हायस्कूल ते गणेश रेसिडेन्सी- डॉ. पळसकर यांच्या घरापर्यंत
मुकुंदवाडी रेल्वेगेट ते बाळापूर रस्ता बीड बायपास