१२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 1, 2017 11:52 PM2017-09-01T23:52:21+5:302017-09-01T23:52:21+5:30
नोव्हेंबर- डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून ७ सप्टेंबर रोजी यासाठी मतदान होणार आहे. याबाबतची आचारसंहिता शुक्रवारी सायंकाळपासूनच या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात लागू झाली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : नोव्हेंबर- डिसेंबर २०१७ मध्ये मुदत संपणाºया जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतीच्या निवडणुका जाहीर झाल्या असून ७ सप्टेंबर रोजी यासाठी मतदान होणार आहे. याबाबतची आचारसंहिता शुक्रवारी सायंकाळपासूनच या ग्रामपंचायतींच्या कार्यक्षेत्रात लागू झाली आहे.
जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतींची मुदत नोव्हेंबर- डिसेंबर २०१७ मध्ये संपणार असल्याने या ग्रा.पं.च्या निवडणुकीची तयारी प्रशासनाने आगोदरपासूनच सुरु केली होती. या संदर्भातील प्रारुप मतदार यादी २२ आॅगस्ट रोजी जाहीर झाली. तर १ सप्टेंबर रोजी अंतिम मतदार यादी जाहीर झाली. या पार्श्वभूमीवर राज्य निवडणूक आयोगाने जिल्ह्यातील १२६ ग्रामपंचायतींच्या निवडणुका जाहीर केल्या आहेत. त्यानुसार ७ सप्टेंबर रोजी या संदर्भात तहसीलदारांकडून नोटीस प्रसिद्ध होणार आहे. १५ ते २२ सप्टेंबर दरम्यान सकाळी ११ ते दुपारी ४.३० या वेळेत नामनिर्देशनपत्र स्वीकारण्यात येणार आहेत. २५ सप्टेंबर रोजी सकाळी ११ वाजेपासून या नामनिर्देशनपत्रांची छाननी होणार आहे. २७ सप्टेंबर रोजी दुपारी ३ वाजेपर्यंत दाखल केलेले नामनिर्देशनपत्र परत घेता येणार आहेत. त्याच दिवशी दुपारी ३ वाजेनंतर अंतिम उमेदवारांना निवडणूक चिन्हांचे वाटप केले जाणार आहे. ७ आॅक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते सायंकाळी ५.३० या वेळेत मतदान होणार आहे. ९ आॅक्टोबर रोजी केंद्रांवर मतमोजणी होणार आहे. ११ आॅक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाकडून अंतिम निकाल प्रसिद्ध केला जाणार आहे.