कोरोनाचा थयथयाट, मराठवाड्यात १२६५ जण बाधित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2020 12:25 PM2020-09-30T12:25:09+5:302020-09-30T12:25:38+5:30

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाचा थयथयाट सुरूच असून मंगळवार दि. २९ रोजी दिवसभरात १ हजार २६५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे  आढळून आले. औरंगाबाद जिल्ह्यात २३७, लातूर २१६, उस्मानाबाद २१६, बीड १४६, जालना ११५, परभणी ८२ तर हिंगोली येथे ३६ रूग्ण आढळले.  औरंगाबादमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून बाधितांची संख्या ३३ हजार ४११ झाली आहे.  तसेच २६ हजार ६२४ जण  कोरोनामुक्त झाले आहेत.  लातूरमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून बाधितांची संख्या १६ हजार ८०६ वर  पोहोचली असून १३ हजार ४८३ जणांनी कोरोनावर मात  केली आहे.  तर  ४७६ जणांचा मृत्यू झाला.  नांदेड येथे बाधितांची संख्या १५, ४४२ झाली असून आतापर्यंत ३९८ जणांचा ...

1265 affected in Marathwada | कोरोनाचा थयथयाट, मराठवाड्यात १२६५ जण बाधित

कोरोनाचा थयथयाट, मराठवाड्यात १२६५ जण बाधित

googlenewsNext

औरंगाबाद : मराठवाड्यात कोरोनाचा थयथयाट सुरूच असून मंगळवार दि. २९ रोजी दिवसभरात १ हजार २६५ जण कोरोना पॉझिटिव्ह असल्याचे  आढळून आले. औरंगाबाद जिल्ह्यात २३७, लातूर २१६, उस्मानाबाद २१६, बीड १४६, जालना ११५, परभणी ८२ तर हिंगोली येथे ३६ रूग्ण आढळले. 

औरंगाबादमध्ये ५ जणांचा मृत्यू झाला असून बाधितांची संख्या ३३ हजार ४११ झाली आहे.  तसेच २६ हजार ६२४ जण  कोरोनामुक्त झाले आहेत.  लातूरमध्ये दोघांचा मृत्यू झाला असून बाधितांची संख्या १६ हजार ८०६ वर  पोहोचली असून १३ हजार ४८३ जणांनी कोरोनावर मात  केली आहे.  तर  ४७६ जणांचा मृत्यू झाला. 

नांदेड येथे बाधितांची संख्या १५, ४४२ झाली असून आतापर्यंत ३९८ जणांचा मृत्यू झाला आहे.  तर आतापर्यंत ११ हजार ७१५ जणांनी कोरोनावर  मात  केली आहे. उस्मानाबाद जिल्ह्यात मंगळवारी ११ जणांचा मृत्यू झाला. एकूण बाधितांची संख्या ११, ९८३ झाली असून ३६७ जणांचा मृत्यू झाला.

बीड जिल्ह्यात मंगळवारी १४६ नवे रूग्ण आढळले असून एकूण बाधंतांची संख्या ९ हजार ८५० झाली आहे.  जालन्यात कोरोनाबाधितांची  एकूण  संख्या  ८ हजार ४४३ असून ६, ४९५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. हिंगोली येथील कोरोनाबाधितांची एकूण  संख्या २ हजार ६४० असून  आतापर्यंत  ३७ जणांचा मृत्यू झाला आहे तर २ हजार २९१ जणांनी कोराेनावर मात केली आहे.  मंगळवारी आढळून आलेल्या ८२ रूग्णांसह परभणी जिल्ह्यातील  कोरोनाबाधित आता ५ हजार ३१७ असून ४ हजार ५०१ रूग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. २२४ रूग्णांचा मृत्यू झाला आहे. 

Web Title: 1265 affected in Marathwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.