१२७ सडकसख्ख्याहरींची पोलिसांकडून झाडाझडती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 23, 2017 01:09 AM2017-09-23T01:09:46+5:302017-09-23T01:09:46+5:30
शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी कोचिंग क्लासेसला जाणाºया तरुणींची छेड काढणाºया सडकसख्ख्याहरींना पोलिसांनी शुक्रवारी चांगलाच चोप दिला़ यावेळी १२७ सडकसख्ख्याहरींना समज देण्यात आली़ मोटार वाहन कायद्याप्रमाणे ६७ जणांवर कारवाई करुन १४ हजार ४०० रुपयांचा दंडही वसूल केला.
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड : शहरातील भाग्यनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत खाजगी कोचिंग क्लासेसला जाणाºया तरुणींची छेड काढणाºया सडकसख्ख्याहरींना पोलिसांनी शुक्रवारी चांगलाच चोप दिला़ यावेळी १२७ सडकसख्ख्याहरींना समज देण्यात आली़ मोटार वाहन कायद्याप्रमाणे ६७ जणांवर कारवाई करुन १४ हजार ४०० रुपयांचा दंडही वसूल केला.
श्रीनगर, बीक़े़हॉल, भाग्यनगर चौक, वर्कशॉप कॉर्नर आदी भागात खाजगी कोचिंग क्लासेसची संख्या मोठी असून येथे हजारो विद्यार्थिनींची ये-जा असते. मागील काही दिवसांपासून काही तरुणाचे टोळके विद्यार्थिनींची छेड काढत असल्याच्या तक्रारी येत असल्याने पोनि़ चंद्रशेखर कदम यांच्या मार्गदर्शनाखाली पोउपनि चंद्रकांत पवार, संगीता कदम, सविता खर्जुले, जाधव, पोहेकॉ़ कुंबरवार, जाकेर, शिरसाठ, विलास कदम, वैजनाथ पाटील, सचिन गायकवाड, रितेश कुलथे, शेख फयाज, सुनीता मालचापुरे यांनी शुक्रवारी साध्या वेषात जाऊन सडकसख्ख्याहरींना चांगलाच चोप दिला. दरम्यान, या छेडछाडीला लगाम घालण्यासाठी पोलिसांनी आता थेट संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे.