१३ बिल्डरांविरुद्ध गुन्हे
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 1, 2017 12:46 AM2017-08-01T00:46:01+5:302017-08-01T00:46:01+5:30
वाळूज महानगर परिसरात सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात अनधिकृत बांधकामे केल्याप्रकरणी १३ बिल्डरांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.३१) गुन्हा दाखल करण्यात आला.
लोकमत न्यूज नेटवर्क
वाळूज महानगर : वाळूज महानगर परिसरात सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात अनधिकृत बांधकामे केल्याप्रकरणी १३ बिल्डरांविरुद्ध एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात सोमवारी (दि.३१) गुन्हा दाखल करण्यात आला. सिडको प्रशासनाच्या या धक्क्यामुळे बिल्डर लॉबीत खळबळ उडाली.
सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात येणाºया वाळूज महानगर परिसरातील घाणेगाव, विटावा, जोगेश्वरी, कमळापूर आदी ठिकाणी सिडकोची परवानगी न घेता विना परवाना बांधकामे सुरू होती. सिडकोचे सहायक नामनिर्देशक अधिकारी गजानन साटोटे, सुरक्षारक्षक के. एल. खैरे, संतोष निकाळजे, किशोर बन्सोडे, तारामती भिसे, अरुणा सुरडकर आदींच्या पथकाने २९ मार्च ते १९ एप्रिल २०१७ या कालावधीत या परिसरात भेटी देऊन पाहणी केली. अनेक बिल्डरांनी अनधिकृतपणे बांधकामे सुरूकेल्याचे पथकाला या पाहणीत दिसून आले.
सिडकोच्या अधिसूचित क्षेत्रात बांधकामे करताना सिडको प्रशासनाकडून नाहरकत प्रमाणपत्र घेणे बंधनकारक आहे; परंतु अनेक बिल्डरांनी नाहरकत प्रमाणपत्र घेतले नसल्याचे समोर आले. त्यामुळे सिडकोने या बिल्डरांना नोटिसा बजावून निर्धारित मुदतीत आवश्यक कागदपत्रे सादर करण्याचे आदेश बजावले होते.