१३ हजार ग्राहकांचा वीजपुरवठा खंडित
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 18, 2018 10:51 PM2018-12-18T22:51:23+5:302018-12-18T22:51:56+5:30
: थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून या मोहिमेंतर्गत औरंगाबाद परिमंडळातील १३ हजार १०२ थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
औरंगाबाद : थकीत वीज बिल न भरणाऱ्या ग्राहकांविरुद्ध विद्युत पुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणने अधिक तीव्र केली आहे. दरम्यान, १ डिसेंबरपासून या मोहिमेंतर्गत औरंगाबाद परिमंडळातील १३ हजार १०२ थकबाकीदार ग्राहकांचा विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे.
यापैकी मागील पंधरवड्यात थकबाकीपोटी १९४३ ग्राहकांचा विद्युत पुरवठा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला होता. या ग्राहकांकडे ३ कोटी ३७ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. याशिवाय ११ हजार १५९ ग्राहकांकडे २३ कोटी ४६ लाख रुपये एवढी थकबाकी असून, त्यांचा तात्पुरता विद्युत पुरवठा खंडित करण्यात आला आहे. यापैकी औरंगाबाद शहर मंडळातील २३७८ ग्राहकांकडे ५ कोटी ५८ लाख रुपये, औरंगाबाद ग्रामीण मंडळातील ४०३२ ग्राहकांकडे ६ कोटी ६४ लाख रुपये थकबाकी, तर जालना मंडळातील ४७४९ ग्राहकांकडे १० कोटी ८३ लाख रुपये थकबाकी आहे.
या मोहिमेत औरंगाबाद शहर मंडळात ३४०० ग्राहकांकडून २ कोटी ३९ लाख, औरंगाबाद ग्रामीण मंडळात ५१९२ ग्राहकांकडून ४ कोटी ४ लाख रुपये, तर जालना मंडळात २५९६ ग्राहकांकडून ३ कोटी ४४ लाख रुपयांची वसुली करण्यात आली. औरंगाबाद परिमंडळात ११ हजार १८८ ग्राहकांकडून १० कोटी २३ लाख रुपयांची वसुली झाली. दरम्यान, थकबाकीदारांविरोधात सुरू असलेली धडक मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे महावितरणने कळविले आहे.
चौकट ...
परिमंडळातील औरंगाबाद शहर, औरंगाबाद ग्रामीण व जालना या तिन्ही मंडळांमध्ये थकबाकीचे प्रमाण वाढले आहे. गेल्या दोन महिन्यांपासून बिल न भरणाºया ४३ हजार ३०६ वीज ग्राहकांकडे १३२ कोटी ८ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. यामध्ये औरंगाबाद शहर मंडळांतर्गत ११ हजार ४५९ ग्राहकांकडे ३२ कोटी ९४ लाख, औरंगाबाद ग्रामीण मंडळांतर्गत १७ हजार ३ ग्राहकांकडे ५१ कोटी ६६ लाख, तर जालना मंडळामध्ये १४ हजार ८४४ ग्राहकांकडे ४७ कोटी ४८ लाख रुपये एवढी थकबाकी आहे. यामध्ये पाणीपुरवठा योजनांच्या १७७९ जोडण्या असून, त्यांच्याकडे ५४ कोटी ५० लाख रुपये थकबाकी असून, शहरी भागातील पथदिव्यांच्या ४४८ जोडण्यांकडे ८ कोटी ७९ लाख रुपये थकबाकी आहे.