शहरात १३, ग्रामीणमध्ये ५३ कोरोनाबाधितांची भर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 26, 2021 04:04 AM2021-06-26T04:04:17+5:302021-06-26T04:04:17+5:30

८५६ रुग्णांवर उपचार सुरू : ग्रामीण भागातील ३ मृत्यू, शहरातील मृत्यू नाही औरंगाबाद : जिल्ह्यात ६६ कोरोनाबाधित रुग्णांची भर ...

13 in urban areas and 53 in rural areas | शहरात १३, ग्रामीणमध्ये ५३ कोरोनाबाधितांची भर

शहरात १३, ग्रामीणमध्ये ५३ कोरोनाबाधितांची भर

googlenewsNext

८५६ रुग्णांवर उपचार सुरू : ग्रामीण भागातील ३ मृत्यू, शहरातील मृत्यू नाही

औरंगाबाद : जिल्ह्यात ६६ कोरोनाबाधित रुग्णांची भर पडली, तर ग्रामीण भागातील ३ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात ११२ जणांचे उपचार पूर्ण झाल्याने शहरातील २० तर ग्रामीण भागातील ९२ जण घरी परतले. सध्या ८५६ बाधितांवर उपचार सुरू आहेत.

कोरोनाबाधित रुग्णांची जिल्ह्यातील एकूण संख्या एक लक्ष ४५ हजार ८४७ झाली आहे. आजपर्यंत एक लक्ष ४१ हजार ५८२ कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आतापर्यंत एकूण ३ हजार ४०९ जणांचा मृत्यू झाल्याने ८५६ रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळविले आहे.

--

मनपा हद्दीत १३ रुग्ण

औरंगाबाद १, कटकट गेट १, राजे संभाजी कॉलनी १, एन-३ येथे १, जाधववाडी १, भारत नगर ब्रिजवाडी १, एन-१ येथे १, श्रेय नगर १, मुकुंदवाडी १, निंरकार नगर १, अन्य ३.

--

ग्रामीण भागात ५३ रुग्ण

औरंगाबाद ३, किनगाव १, पळसवाडी १, गंगापूर ४, कन्नड ८, वैजापूर २३, पैठण ९, सोयगांव ४ बाधित आढळून आले.

--

३ बाधितांचे मृत्यू

घाटी रुग्णालयात गंगापूर येथील मोंढा परिसरातील ४४ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ६५ वर्षीय महिला, खासगी रुग्णालयात ४६ वर्षीय चिंचोली येथील महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

Web Title: 13 in urban areas and 53 in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.