मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १३०० कोटी; पहिल्या टप्प्यातील अनुदान जाहीर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 10, 2020 07:13 PM2020-11-10T19:13:35+5:302020-11-10T19:24:13+5:30

आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत ही मदत वाटप करावी लागणार आहे.

1300 crore to the affected farmers in Marathwada; First phase grant announced | मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १३०० कोटी; पहिल्या टप्प्यातील अनुदान जाहीर

मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना १३०० कोटी; पहिल्या टप्प्यातील अनुदान जाहीर

googlenewsNext
ठळक मुद्देमराठवाड्यातील २६ लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान

औरंगाबाद : मराठवाड्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिवाळीच्या तोंडावर शासनाने १३०० कोटी रुपयांची पहिल्या टप्प्यातील मदत जाहीर केली. एसडीआरएफच्या निकषानुसार ८८० कोटी आणि वाढीव दराने शेती आणि बहुवार्षिक पिकांसाठी ४२० कोटी, असे १३०० कोटी रुपयांचे अनुदान उद्यापासून शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे. आचारसंहितेचे उल्लंघन होणार नाही याची काळजी घेत ही मदत वाटप करावी लागणार आहे.

मराठवाड्यातील २६ लाख हेक्टरवरील खरीप हंगामातील पिकांचे नुकसान झाले असून, ३५ लाख ७० हजार शेतकऱ्यांना अंदाजे २६०० कोटी रुपये भरपाईसाठी लागतील, असा अंतिम अहवाल विभागीय प्रशासनाने शासनाकडे ऑक्टोबरअखेरीस पाठविला. ३३ टक्क्यांपेक्षा जास्त क्षेत्राचे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना ही मदत मिळणार आहे. विभागीय प्रशासनानुसार २६०० कोटी रुपये अतिवृष्टीग्रस्तांसाठी लागणार आहेत. यात खरीप हंगामातील पिकांसह फळबागांचा समावेश आहे. १० हजार प्रतिहेक्टरप्रमाणे २ हेक्टर मर्यादेत असलेल्या शेतीसाठी २४६२ कोटी आणि २५ हजार प्रतिहेक्टर मर्यादा असलेल्या शेतीसाठी ८३ कोटी, असे २५४६ कोटी रुपये लागणार आहेत.

औरंगाबाद जिल्ह्यातील २ लाख ६५ हजार हेक्टर, जालना ४ लाख ९३ हजार, परभणी १ लाख ७९ हजार, हिंगोली २ लाख २७ हजार, नांदेड ५ लाख ६४ हजार, तर बीडमधील २ लाख ५५ हजार हेक्टर, लातूर २ लाख ५० हजार, उस्मानाबाद जिल्ह्यातील २ लाख ५९ हजार, असे २५ लाख हेक्टरच्या आसपास नुकसान पावसामुळे झाले.

जिल्हा    बाधित शेतकरी     पहिला हप्ता
औरंगाबाद     ३ लाख ७३६९८     १४३ कोटी
जालना    ५ लाख ७९१९६     २७१ कोटी
परभणी    २ लाख ५२१८५     ९० कोटी
हिंगोली     ३ लाख ७६२३ १    १५ कोटी
नांदेड      ७ लाख ४४०९     २८४ कोटी
बीड     ४ लाख ३२७०६     १५४ कोटी
लातूर     ४ लाख ३३०४२     १२९ कोटी
उस्मानाबाद     ३ लाख ९८८०५     १४८ कोटी
एकूण    ३५ लाख ७० हजार     १३३४ कोटी
 

Web Title: 1300 crore to the affected farmers in Marathwada; First phase grant announced

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.