औरंगाबादचे १,३४५ विद्यार्थी तंत्रनिकेतन पदविकाधारक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2018 12:41 AM2018-02-23T00:41:31+5:302018-02-23T00:41:36+5:30

शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षातील १,३४५ विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमाची पदविका प्रदान करण्यात आली. पदवी स्वीकारताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनीही पदवी प्रदान सोहळ्याला हजेरी लावली.

1,345 students of Aurangabad Polytechnic Diploma holder | औरंगाबादचे १,३४५ विद्यार्थी तंत्रनिकेतन पदविकाधारक

औरंगाबादचे १,३४५ विद्यार्थी तंत्रनिकेतन पदविकाधारक

googlenewsNext
ठळक मुद्देपदविका प्रदान सोहळा : विद्यार्थ्यांमध्ये उत्साह; प्रशासनाचे ढिसाळ नियोजन

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिक्षण घेतलेल्या २०१५-१६ आणि २०१६-१७ या दोन वर्षातील १,३४५ विद्यार्थ्यांना पदविका अभ्यासक्रमाची पदविका प्रदान करण्यात आली. पदवी स्वीकारताना विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड उत्साह होता. गुणवंत विद्यार्थ्यांच्या पालकांनीही पदवी प्रदान सोहळ्याला हजेरी लावली. मात्र, तंत्रनिकेतन प्रशासनाच्या ढिसाळ नियोजनामुळे अनेकांच्या उत्साहावर पाणी फेरल्याची चर्चा सोहळ्यास्थळी करण्यात येत होती.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात शिकविण्यात येणारा सिव्हिल, मेकॅनिकल, इलेक्ट्रिकल, इलेक्ट्रॉनिक्स अ‍ॅण्ड टेलिकम्युनिकेशन, ड्रेस डिझायनिंग अ‍ॅण्ड गारमेंट मॅनिफॅ क्चरिंग, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी, कॉम्प्युटर आणि आॅटोमोबाईल इंजिनिअरिंग अभ्यासक्रम पूर्ण करणाºया विद्यार्थ्यांना पाहुण्यांचे हस्ते पदवी प्रदान करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून उद्योजक उमेश दाशरथी होते. अध्यक्षस्थानी तंत्रशिक्षण विभागाचे सहसंचालक डॉ. महेश शिवणकर होते. तर मंचावर प्राचार्य एफ. ए. खान, परीक्षा नियंत्रक डॉ. प्रमोद काळे, प्रा. जे. एस. पाटील, प्रा. आर. एन. खडसे, डॉ. एल. आय. शेख, डॉ. आर. जी. वाडेकर, प्रा. जे. एस. लकडे, प्रा.जे. पी. जोशी, प्रा. जनेश दळवी, प्रा. एस. आर. भस्मे आदी उपस्थित होते. या सोहळ्यामध्ये दोन्ही वर्षातील आठही शाखांमधील प्रत्येकी तीन गुणवंत विद्यार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते पदवी आणि पारितोषिके देऊन सन्मानित केले. यात दोन्ही वर्षांचे एकूण ४८ विद्यार्थ्यांचा समावेश आहे. पदवी प्रदान समारंभ संपल्यानंतरही विद्यार्थ्यांनी जोरदार फोटोसेशन केले.
प्रत्येक दिवस शेवटचा ...
विद्यार्थ्यांनी वेळेचा सदुपयोग केला पाहिजे. हा सदुपयोग केल्यास यश निश्चितच मिळते. यासाठी प्रत्येक दिवस हा शेवटचा दिवस म्हणून जगले पाहिजे, असे मत सोहळ्यात उद्योजक उमेश दाशरथी यांनी व्यक्त केले. प्रत्येकाने स्वत:चे स्वप्न पूर्ण केले पाहिजे. सचिन तेंडुलकर, इंद्रा नुुई, स्टिव्ह जॉब, शिवाजी महाराज, या महापुरुषांच्या जीवनातील काही घटना सांगून विद्यार्थ्यांनी त्यांच्यासारखे कार्य केले पाहिजे, असा आशावादही दाशरथी यांनी व्यक्त केला.
विद्यार्थीसंख्याबाबत अनभिज्ञ
सोहळ्यात किती विद्यार्थ्यांना उपस्थितीत आणि अनुपस्थितीत पदवी प्रदान करण्यात आली, याची आकडेवारी आयोजकांकडेच नव्हती. अनेकांना विचारपूस केली असता, प्रत्येक जण चुकीची माहिती देत होता. परीक्षा नियंत्रक डॉ. प्रमोद काळे यांनी परिपूर्ण आकडेवारी सादर केली.

Web Title: 1,345 students of Aurangabad Polytechnic Diploma holder

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.