उस्मानाबादजवळ 14 उंटांची अवैध वाहतूक करणारा ट्रक जप्त
By ऑनलाइन लोकमत | Published: September 9, 2018 11:13 AM2018-09-09T11:13:25+5:302018-09-09T11:19:00+5:30
अवैधरित्या उंटांची वाहतूक करणारा ट्रक औरंगाबाद पोलिसांनी जप्त केल्याची घटना समोर आली आहे.
औरंगाबाद/उस्मानाबाद - अवैधरित्या उंटांची वाहतूक करणारा ट्रक औरंगाबादपोलिसांनी जप्त केल्याची घटना समोर आली आहे. शनिवारी (9 सप्टेंबर) हा ट्रक जप्त करण्यात आला असून ट्रक चालकाला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. एएनआय या वृत्तसंस्थेने दिलेल्या वृत्तानूसार, जप्त केलेल्या ट्रकमध्ये एकूण 14 उंट होते. मात्र त्यापैकी एका उंटाचा मृत्यू झाला. उंटांची सुटका करण्यात आली असून गायींसाठी तयार करण्यात आलेल्या निवाऱ्यामध्ये त्यांना सध्या ठेवण्यात आले आहे.
Aurangabad(Maharashtra): 14 camels rescued from a truck yesterday. They were being taken from Rajasthan to Hyderabad when the truck was intercepted by Police. Out of the 14, 1 camel died, rest were sent to a cow shelter in the city pic.twitter.com/BjvwxLPN5W
— ANI (@ANI) September 9, 2018
औरंगाबाद पोलिसांना राजस्थानहून आणलेले हे उंट हैदराबादला कत्तलखान्यात नेण्यात येणार असल्याची माहिती मिळाली होती. याप्रकरणाची अधिक माहिती मिळताच पोलिसांनी सापळा रचला. त्यानुसार उस्मानाबादजवळ अडवलेल्या ट्रकमध्ये 14 उंट होते. ट्रक चालकाला पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले आहे. अवैधरित्या उंटांची वाहतूक करणारं एखादं रॅकेट यामागे असल्याचा अंदाज व्यक्त केला जात आहे.