१४ तास रंगली मिरवणूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 7, 2017 01:16 AM2017-09-07T01:16:58+5:302017-09-07T01:16:58+5:30

गजानननगर, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, शिवाजीनगर, गारखेड्यासह नवीन औरंगाबाद परिसरातील गणेशभक्तांनी मंगळवारी (दि.५) जल्लोषात लाडक्या गणरायाला निरोप दिला

14-hour confectionery | १४ तास रंगली मिरवणूक

१४ तास रंगली मिरवणूक

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : गजानननगर, पुंडलिकनगर, जयभवानीनगर, शिवाजीनगर, गारखेड्यासह नवीन औरंगाबाद परिसरातील गणेशभक्तांनी मंगळवारी (दि.५) जल्लोषात लाडक्या गणरायाला निरोप दिला. टाळ-मृदंग, ढोल-ताशांबरोबर डीजेच्या तालावर ठेका धरून लहान मुले, तरुण-तरुणी, ज्येष्ठ गणेशभक्तांनी शिवाजीनगर येथील विहिरीत ‘श्री’च्या मूर्तींचे विसर्जन केले.
घरगुती गणेशमूर्तींचे विसर्जन करण्यासाठी सकाळपासूनच विसर्जन विहिरीवर गणेशभक्त दाखल होत होते. तर गणेश मंडळे दुपारनंतर ‘श्रीं’च्या विसर्जनासाठी मिरवणुकीने निघाली. गणेशभक्तांनी गुलालाची येथेच्छ उधळण केली. पुंडलिकनगर, गजानन महाराज मंदिर, सूतगिरणी चौक मार्गे येणाºया गणेश मंडळाच्या स्वागतासाठी नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघ, नवीन औरंगाबाद शहर श्री गणेश महासंघ, औरंगाबाद पूर्व शहर गणेश महासंघ, श्री गजानन महाराज न्यू गणेश मित्र मंडळ, भारतीय जनता पार्टीसह राजकीय पक्षांनी व्यासपीठे उभारली होती.
टाळ-मृदंगाचा गजर
गजानन महाराज मंदिर परिसरातील नवीन औरंगाबाद श्री गणेश महासंघाच्या श्री विसर्जन मिरवणुकीला दुपारी दोन वाजता सुरुवात झाली. यावेळी खा. चंद्रकांत खैरे, आ. सुभाष झांबड, आ. अतुल सावे, राजू शिंदे, भाऊसाहेब जगताप, नामदेव पवार, माजी आमदार प्रदीप जैस्वाल, बसवराज मंगरुळे, डॉ. भागवत कराड, अनिल मकरिये, दिलीप थोरात, राहुल सावंत यांच्यासह महासंघाचे संस्थापक अध्यक्ष बबन डिडोरे पाटील, अध्यक्ष बाळूसेठ कुंकुलोळ जैन, उपाध्यक्ष अ‍ॅड. विशाल राऊत, कार्याध्यक्ष मनोज चोपडा, सचिव सचिन शिरसाठ, पंजाबराव तौर, रमेश दिसागज, बाळासाहेब हरबल, विशाल डिडोरे, अनिल भराड, नारायण पारटकर, संतोष दिडवाले, अजय डिडोरे आदी उपस्थित होते. प्रारंभी महासंघाच्या व्यासपीठासमोर लेझीम आणि कवायती सादर करून शालेय विद्यार्थ्यांनी सर्वांची वाहवा मिळविली. त्यानंतर चांदीच्या रथात गणेशमूर्ती विराजमान करून मिरवणुकीला सुरुवात झाली. पारंपरिक वेशभूषेसह फेटा बांधून सहभागी झालेल्या भजनी मंडळाने टाळ-मृदंगाचा गजर करीत वातावरण भक्तीमय केले.
महाप्रसाद, पाणी वाटप
विसर्जन मार्गात ठिकठिकाणी गणेशभक्तांना शिवाजीनगर मित्र मंडळाचे जनार्दन चोपडे, प्रमोद झाडखंडे, अनिल पाटील, संदीप भुसावळकर, बाळू गाढे, ऋषभ जोगड यांनी मसाला चना, अशोक रंगदळ, सुवर्णलता रंगदळ, योगेश रंगदळ, ऋषिकेश रंगदळ, रेणुका रंगदळ यांच्यातर्फे बुंदी, जितेंद्र जाधव, सीमा जाधव, भरत आवटे, शशिकांत जाधव, करण आवटे यांच्यातर्फे शिरा, रोहित वट्टमवार, राजेश्वर वट्टमवार, चित्रा नेरकर, वंदना नेरकर, रत्नमाला वट्टमवार, रोहिणी वट्टमवार यांच्या वतीने मसाले भात तसेच राजेंद्र बेंद्रे यांनी पाणी वाटप केले.
पुष्पवृष्टीने मिरवणुकीची सुरुवात
औरंगाबाद पूर्व शहर गणेश महासंघाच्या मिरवणुकीस सायंकाळी सहा वाजता पुंडलिकनगर येथील छत्रपती शिवाजी महाराज चौक
येथे पुष्पवृष्टी करून सुरुवात
झाली.
यावेळी आ. सुभाष झांबड, आ. अतुल सावे यांच्यासह महासंघाचे संस्थापक अध्यक्ष विठ्ठलराव जाधव पा., बाबूराव कवसकर, अशोक गायकवाड, शैलेश भिसे, सुनील देशमुख, वसंत महाराज, नंदकुमार वाखुरे, लक्ष्मण मोटे, गणेश थोरात, विकास आनंद, संकेत शेटे, कैलास राठोड आदी उपस्थित होते. नवीन औरंगाबाद शहर श्री गणेश महासंघातर्फे आॅर्केस्ट्रॉचे आयोजन करण्यात आले होते. संस्थापक अध्यक्ष पंजाबराव वडजे पा., राजेश पवार आदी उपस्थित होते.

Web Title: 14-hour confectionery

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.