१४ कृषी केंद्रांचे परवाने अधिकाऱ्यांकडून निलंबित

By Admin | Published: July 11, 2014 12:06 AM2014-07-11T00:06:51+5:302014-07-11T01:03:27+5:30

हिंगोली : शेतकऱ्यांना योग्य त्या निविष्ठा न पुरविणे, भावफलक न लावणे आदी कारणावरून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी औंढा तालुक्यातील १४ कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत.

14 licenses of agricultural centers suspended by the authorities | १४ कृषी केंद्रांचे परवाने अधिकाऱ्यांकडून निलंबित

१४ कृषी केंद्रांचे परवाने अधिकाऱ्यांकडून निलंबित

googlenewsNext

हिंगोली : शेतकऱ्यांना योग्य त्या निविष्ठा न पुरविणे, भावफलक न लावणे आदी कारणावरून जिल्हा परिषदेचे कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी औंढा तालुक्यातील १४ कृषी केंद्राचे परवाने निलंबित केले आहेत.
औंढा तालुक्यातील गणेश कृषी केंद्र पोटा खु., पार्डी सावळी येथील साई कृषी केंद्र, शिरड येथील वैभव कृषी केंद्र, कंदी कृषी केंद्र, औंढा येथील सिद्धनाथ कृषी केंद्र, सत्यम ट्रेडर्स, नम्रता कृषी केंद्र, जवळा ब् ााजार येथील बालाजी ट्रेडींग, रोकेडेश्वर कृषी केंद्र, नागेश्वर कृषी केंद्र, अर्थव अ‍ॅग्रो एजन्सी, अनखळी येथील माऊली कृपा कृषी केंद्र, वडचुना येथील मातोश्री कृषी केंद्र आणि तपोवण येथील गणेश कृषी केंद्र या दुकानांनी कृषी निविष्ठा परवाना घेवून शेतकऱ्यांना वेळेवर त्या पुरविल्या नाहीत. भावफलक लावले नाही, साठा पुस्तिका अपूर्ण ठेवल्या आदी कारणावरून त्यांचे परवाने निलंबित करण्यात आले असल्याचे जिल्हा कृषी विकास अधिकारी संजय नाब्दे यांनी सांगितले. (जिल्हा प्रतिनिधी)

Web Title: 14 licenses of agricultural centers suspended by the authorities

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.