पुराच्या पाण्यात १४ मजूर अडकले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 21, 2021 04:05 AM2021-09-21T04:05:47+5:302021-09-21T04:05:47+5:30
सोयगाव : जरंडी मंडळातील घोसला, तिडका, अंजोला शिवारात सोमवारी रात्री तीन तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने अंजोला शिवारातील ...
सोयगाव : जरंडी मंडळातील घोसला, तिडका, अंजोला शिवारात सोमवारी रात्री तीन तास मुसळधार पाऊस झाला. या पावसाने अंजोला शिवारातील गट क्र. ३९ मधील १४ मजूर पुराच्या पाण्यात अडकले आहेत. ग्रामस्थांनी पुरातून या मजुरांना सुरक्षित स्थळी तिडका गावात हलविल्याने दिलासा मिळाला आहे.
सोयगाव तालुक्यात घोसला, तिडका, गोंदेगाव, अंजोला या भागात सोमवारी सात वाजेपासून ते रात्री दहापर्यंत ढगफुटीसदृश पाऊस झाला. यात पिकांची माती झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले. दरम्यान, ढगफुटीच्या पावसामुळे तिडका, घोसला या गावांना पुराच्या पाण्याने विळखा घातला. या गावांतील नागरिक जीव मुठीत घेऊन होते. सोयगाव परिसरालाही दमदार पावसाने रात्री तडाखा दिला. दरम्यान, अंजोला शिवारात अडकलेल्या १४ मजुरांना बाहेर काढण्यासाठी तिडका येथील ग्रामस्थांनी मोठे परिश्रम घेऊन त्यांना सुरक्षित स्थळी हलविले.
200921\2143-img-20210920-wa0156.jpg
सोयगाव-रात्रीच्या पुरात अडकलेले पुरतील मजूर जीव मुठीत घेऊन