द गाईडचे १४ हजार विद्यार्थ्यांनी घेतले मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2021 04:02 AM2021-09-12T04:02:17+5:302021-09-12T04:02:17+5:30
२०१८ साली द गाईडची स्थापना करणारे चंद्रकांत उन्हाळे यांनी पुणे येथील सीओईपी या कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युकेशनमध्ये बी.टेक. केले. ...
२०१८ साली द गाईडची स्थापना करणारे चंद्रकांत उन्हाळे यांनी पुणे येथील सीओईपी या कॉलेजमध्ये इलेक्ट्रॉनिक्स ॲण्ड टेलिकम्युकेशनमध्ये बी.टेक. केले. यानंतर ४ वर्षे त्यांनी पुणे आणि औरंगाबादेतील खासगी कोचिंग कॉलेजमध्ये विद्यार्थ्यांना शिकवण्याचे काम केले. गतवर्षी २०१९, २०२० मध्ये विविध कोचिंग क्लास आणि शाळांमध्ये सेमिनारच्या माध्यमातून १४ हजार विद्यार्थ्यांना द गाईडने मार्गदर्शन केले, तसेच यावर्षी ६७० विद्यार्थ्यांनी द गाईडची मदत घेतली.
-------------------
टॉप कॉलेजमध्ये मेडिकल, इंजिनिअरिंगला प्रवेश मिळेपर्यंत द गाईडचे मार्गदर्शन
द गाईडचे संचालक चंद्रकांत उन्हाळे म्हणाले की, नीट आणि एमएचटी सीईटीचा ऑनलाइन फॉर्म भरताना चुका होणार नाहीत, यासाठी आम्ही आधी ऑफलाइन फॉर्म भरून घेतो. यात कोणतीही चूक नसल्याची खात्री झाल्यानंतर ऑनलाइन फॉर्म आणि फिस भरण्याची प्रक्रिया पूर्ण केली जाते. भरलेल्या फॉर्मची कॉपी द गाईडकडे असते. नीट आणि एमएचटी सीईटीमध्ये विद्यार्थ्याला प्राप्त गुणांच्या आधारे शासनाच्या विविध योजनेंतर्गत त्याला त्याच्या आवडीच्या शाखेला आणि देशातील चांगल्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळावा, यासाठी संपूर्ण मार्गदर्शन द गाईड कडून केले जाते. मेडिकल आणि इंजिनिअरिंगची प्रवेश प्रक्रिया किचकट असते. पालक आणि विद्यार्थ्यांना याविषयी माहिती नसते, अशावेळी वेगवेगळ्या राज्यांतील मेडिकल कॉलेजची प्रवेश प्रक्रिया कशी राबविली जाते, प्रवेश प्रक्रियेसाठी आवश्यक कागदपत्रे कोणती, कोणत्या कॉलेजचा ऑप्शन द्यावा, ॲडमिशन प्रक्रियेची नियमावली काय, कट ऑफ कसा असतो, प्रवेश प्रक्रिया किती टप्प्यात राबविली जाते, यासोबतच इंजिनिअरिंगची कोणती शाखा निवडावी, देशातील नामांकित कॉलेजमध्ये प्रवेश कसा मिळविता येतो, याविषयी अचूक मार्गदर्शन द गाईडकडून देण्यात येते.
-------------------
औरंगाबाद सोबत अहमदनगरमध्ये द गाईड
औरंगाबाद येथील उस्मानपुरा येथील मोर सुपर मार्केटसमोरील घोरपडे कॉम्प्लेक्समध्ये द गाईड संस्था कार्यरत आहे. यासोबत अहमदनगर येथेही द गाईड विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करीत असते. नीट आणि एमएचटी सीईटी आणि मेडिकल इंजिनिअरिंगला जाऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांनी आणि त्यांच्या पालकांनी द गाईडच्या ८१८१९१९१९४ या मोबाइल क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन संचालक उन्हाळे यांनी केले.
----------------------------------
(जोड -पालक आणि विद्यार्थ्यांच्या प्रतिक्रिया आहेत)