छत्रपती संभाजीनगरात गणपतीची १४१ मंदिरे; भक्तांसाठी पर्वणीच

By प्रशांत तेलवाडकर | Published: September 29, 2023 07:17 PM2023-09-29T19:17:05+5:302023-09-29T19:17:37+5:30

दररोज दोन मंदिरांचे दर्शन घेतले तरी कमी पडतील दोन महिने

141 temples of Ganpati in Chhatrapati Sambhajinagar; Festival for devotees | छत्रपती संभाजीनगरात गणपतीची १४१ मंदिरे; भक्तांसाठी पर्वणीच

छत्रपती संभाजीनगरात गणपतीची १४१ मंदिरे; भक्तांसाठी पर्वणीच

googlenewsNext

छत्रपती संभाजीनगर : शहरात गणपती बाप्पांची किती मंदिरे आहेत? तुम्ही दररोज दोन मंदिरांना भेट दिली तरी दोन महिन्यांपेक्षा जास्त दिवस लागतील एवढी म्हणजेच शहरात गणपतीची १४१ मंदिरे आहेत. त्यातील अनेक मंदिरे भाविकांना माहीतही नसतील.

मंदिराचे अभ्यासक प्रा. अनिल मुंगीकर यांनी शहरातील १ हजार मंदिरांना भेट देऊन त्यांची माहिती संकलित करीत १० खंड तयार केले आहेत. त्यांच्याकडील मंदिरांच्या संकलनात शहरात गणपतीच्या १४१ मंदिरांची माहिती आहे. छत्रपती संभाजीनगरातील मंदिरांचा एवढा सूक्ष्म अभ्यास प्रा. मुंगीकरांनी केला आहे की, १४१ पैकी सिद्धिविनायकाची मंदिरे किती आहेत याचीही आकडेवारी त्यांच्याकडे आहे. नुकतीच त्या मंदिरांची माहितीच नव्हे तर ती मंदिरे व मूर्तीचे छायाचित्रेही त्यांच्याकडे आहेत. गणेशोत्सव सुरू आहे आणि अनेक गणेश भक्त या काळात अष्टविनायकाच्या दर्शनला जात असतात. पण, शहरात अष्टविनायकाची ४ मंदिरे आहेत. पावन गणपती नावाची १० मंदिरे शहरात आहेत. याशिवाय राजुरेश्वर, शिवशक्ती, वरद, जागृत, विघ्नहर्ता मंदिर आहेच; शिवाय ६२ अशीही गणेश मंदिरे आहेत, त्यांना वेगळे नाव दिलेले नाही. प्रत्येक मंदिरात उत्सव मूर्तीची स्थापना करण्यात आली आहे. सर्व मंदिरांत विविध कार्यक्रमांचे आयोजन केले जाते.

शहरात कोणत्या नावाच्या गणपतीची किती मंदिरे?
गणेश मंदिराचे नाव--- मंदिरांची संख्या

१) सिद्धिविनायक २८, २) विघ्नहर्ता १४, ३) पावन १०, ४) अष्टविनायक ४, ५) राजुरेश्वर २, ६) पूर्णसिद्धी २, ७) जागृत २, ८) हेरंब २, ९) यादगार १, १०) विनय १, ११) वरद १, १२) शिवशक्ती १, १३) शिवगणेश १, १४) संस्थान १, १५) सन्मित्र १, १६) साई १, १७) ऋणमोचन १, १८) नंदीगणेश १, १९) कुशल १, २०) सिंहगड १, २१) चिंतामणी १, २२) दशभूजा १, २३) काळा १, २४) नाव नसलेले ६२

सिद्धिविनायकाची सर्वाधिक मंदिरे
शहरात १४१ मंदिरांपैकी सर्वाधिक २८ गणेश मंदिरे ही सिद्धिविनायकाची आहेत. आजूबाजूला रिद्धी व सिद्धी या गणपतीच्या पत्नी आहेत. सिद्धिविनायकाची मूर्ती उजव्या सोंडेची असून, या मंदिरांमध्ये सोवळे कडक पाळले जाते.

Web Title: 141 temples of Ganpati in Chhatrapati Sambhajinagar; Festival for devotees

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.