जिल्ह्यात ५३ गावांत कोरोनाचे १४३ रुग्ण, वैजापूृर तालुका अजूनही हॉटस्पॉट !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2021 04:02 AM2021-08-17T04:02:56+5:302021-08-17T04:02:56+5:30

--- योगेश पायघन औरंगाबाद : जिल्ह्यातील १३६८ गावांपैकी गेल्या १० दिवसांत ५३ गावांत बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या ...

143 corona patients in 53 villages in the district, Vaijapur taluka still hotspot! | जिल्ह्यात ५३ गावांत कोरोनाचे १४३ रुग्ण, वैजापूृर तालुका अजूनही हॉटस्पॉट !

जिल्ह्यात ५३ गावांत कोरोनाचे १४३ रुग्ण, वैजापूृर तालुका अजूनही हॉटस्पॉट !

googlenewsNext

---

योगेश पायघन

औरंगाबाद : जिल्ह्यातील १३६८ गावांपैकी गेल्या १० दिवसांत ५३ गावांत बाधित रुग्ण आढळून आले आहेत. सध्या सक्रिय असलेल्या १४३ रुग्णांमध्ये सर्वाधिक रुग्ण वैजापूर तालुक्यातील असून खुलताबाद आणि सोयगाव तालुक्यात गेल्या दहा दिवसांत एकही रुग्ण आढळून आला नाही. ४७६ दिवसांच्या कोरोना संक्रमण कालावधीत ६० हजार २९५ रुग्णांना बाधा झाली होती. ५५ हजार ५७८ जण कोरोनामुक्त होऊन घरी परतले. १५७४ जणांचा मृत्यू झाला असून सध्या १४३ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

आतापर्यंत जिल्ह्यातील १३६८ गावांपैकी १३०९ गावांत कोरोनाचे संक्रमण पोहोचले. कोरोनाच्या दोन्ही लाटांत आतापर्यंत २०४ गाव, वाड्या, वस्त्या या कोरोनापासून मुक्त राहिल्या. तर १,०४३ गावांतून गेल्या २८ दिवसांत एकही कोरोनाचा रुग्ण आढळून आला नाही. आता बाधित गावांची तसेच रुग्णांची संख्या कमी होत आहे. रविवारपर्यंत वैजापूर तालुक्यात ५७, पैठण तालुक्यात ३१, गंगापूर तालुक्यात २४, औरंगाबादमध्ये १४ सक्रिय रुग्ण आहेत. फुलंब्री ६, कन्नड ५, सिल्लोडमध्ये ५ बाधितांवर उपचार सुरू आहेत. लसीकरणाला गती देण्याचा प्रयत्न सुरू आहे. आतापर्यंत ग्रामीण भागात ५ लाख ८६ हजार ७९७ जणांनी पहिला तर १ लाख ४९ हजार ३८८ जणांनी दुसरा डोस घेतला आहे. असे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सुधाकर शेळके यांनी सांगितले.

सावधान, या गावांत पॉझिटिव्ह

तालुका - गावे

औरंगाबाद -सिडको महानगर, करमाड, टोणगाव, बजाजनगर, पाटोदा, शेंद्रा, सावंगी, माळीवाडा

गंगापूर - कायगाव, गडलिंब, लासूर, जांबगाव, अंमळनेर, शिरसवडगाव , कोबापूर

पैठण - मुलानी वडगाव, लोहगाव, घारी, चांगतपुरी, पैठण, मायगांव, राहटगाव, वाहेगाव, विहामांडवा

फुलंब्री - चिंचोली, बोधेगाव, नारळा, मारसावळी

कन्नड - कोळवाडी, वाकी

वैजापूर - सुदामवाडी वैजापूर, चेंडूफळ, सिरसगाव, बाबतारा, बावलगाव, वराडी सागज, जांबरगांव, नांदगांव, पानवखंडाळा, पानवखुर्द, बिलोनी, भायगांव, साफियाबादवाडी, कोर्ही, सोनवाडी, खंडाळा, बाबूळगाव, कनजसागज, शिवराई, परसोडा, धोंदलगांव

सिल्लोड - सिल्लोड

खुलताबाद - एकही रुग्ण गेल्या दहा दिवसांत आढळला नाही

सोयगाव - एकही रुग्ण गेल्या दहा दिवसांत आढळला नाही

----

दररोज २ हजार चाचण्या

--

जिल्ह्यात संपर्कातील रुग्णांना शोधणे, आरटीपीसीआर तपासण्यां दररोज करण्यात येत आहेत. दीड ते अडीच हजारांपर्यंत तपासण्या करण्यात येत आहेत. गेल्या दहा दिवसांत २३ ते १३ दरम्यान बाधित रुग्ण आढळून आले आहेत. दिवसेंदिवस पाॅझिटीव्हीटी रेट कमी होत असून रिकव्हरी रेट वाढत असल्याची माहीती डाॅ. जी. एम. कुडलीकर, डाॅ. एस.एन भराडकर यांनी दिली.

Web Title: 143 corona patients in 53 villages in the district, Vaijapur taluka still hotspot!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.