सिल्लोड कृषी उत्पन्न बाजारसमिती निवडणुकीत १८ जागेसाठी १४३ उमेदवारी अर्ज
By ऑनलाइन लोकमत | Published: December 29, 2023 07:26 PM2023-12-29T19:26:56+5:302023-12-29T19:28:08+5:30
उमेदवारी मागे घेण्याची शेवटी तारीख १६ जानेवारी आहे.
सिल्लोड: कृषी उत्पन्न बाजार समिती निवडणुकीची धामधूम सुरू झाली आहे. उमेदवारी दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी १८ जागेसाठी शुक्रवारी दुपारी ३ वाजेपर्यंत एकूण १४३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत. या उमेदवारी अर्जाची छाननी १ जानेवारीला होणार आहे.
सहकारी संस्था सर्वसाधारण ७ जागेसाठी ४८ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आले आहे.त्याच प्रमाणे सहकारी संस्था इतरमागावर्ग १ जागेसाठी ६ अर्ज आले आहे.सहकारी संस्था वि. जा.भ.ज. १ जागेसाठी ८ उमेदवारी अर्ज आले आहे.सहकारी संस्था महिला मतदार संघातून २ जागेसाठी १३ उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे.ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदार संघातून २ जागेसाठी २५ उमेदवारी अर्ज आले आहे.ग्रा.प.अ.जा.अ. ज.:-एक जागेसाठी ११ अर्ज आले आहे.ग्रा.प.दुर्बल घटक मधून एक जागेसाठी ८ अर्ज आले आहे.व्यापारी मतदार संघातून दोन जागेसाठी १८ अर्ज आले आहे.हंमाल मापाडी मतदार संघातून एका जागेसाठी ६ अर्ज आले आहे.असे एकूण १८ जागेसाठी १४३ उमेदवारी अर्ज दाखल करण्यात आल्याची माहिती निवडणूक निर्वाचन अधिकारी ज्ञानेश्वर मातेरे यांनी दिली. दरम्यान, उमेदवारी मागे घेण्याची शेवटी तारीख १६ जानेवारी आहे. चिन्ह वाटप १७ जानेवारी रोजी तर मतदान २८ तारखेला होणार आहे.
या निवडणुकीत बाजार समितीचे माजी विद्यमान सभापती अर्जुन पाटील गाढे, माजी उपसभापती नंदकिशोर सहारे, माजी संचालक सतीश ताठे, कारखान्याचे माजी चेअरमन श्रीरंग साळवे, अरुण पाटील शिंदे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष केशवराव तायडे, प्रभाकर काळे, पंजाब चव्हाण, बाजार समितीचे माजी उपसभापती ठगण भागवत पाटील, शांतीलाल अग्रवाल, अंकुश पाटील, विश्वाला दाभाडे, वैभव तायडे,राष्ट्रवादी चे तालुकाध्यक्ष देविदास आमटे,माजी सरपंच चंद्रशेखर साळवे,शिवसेना उद्धव गटाचे सुदर्शन अग्रवाल,भाजपचे दिलीप दानेकर,भाजपचे माजी नगर परिषद उपाध्यक्ष किरण पवार,अजिंठ्याचे मेघराज चोंडिये,माजी नगराध्यक्ष बनेखा पठाण,भावराव लोखंडे या मातब्बर नेत्यांनी आपली उमेदवारी दाखल केली आहे.