१४४ उमेदवार निवडणुकीसाठी अपात्र
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 12:38 AM2017-07-30T00:38:02+5:302017-07-30T00:38:02+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क नांदेड: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढविणाºया उमेदवारांनी खर्चाचा हिशेब विहित मुदतीत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
नांदेड: जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक लढविणाºया उमेदवारांनी खर्चाचा हिशेब विहित मुदतीत राज्य निवडणूक आयोगाकडे सादर न केल्यामुळे अशा उमेदवारांना अपात्र ठरविण्यात आले आहे़ नांदेड जिल्ह्यात खर्च सादर न करणाºया १४४ उमेदवारांना आता पुढील पाच वर्षांसाठी जिल्हा परिषद किंवा पंचायत समितीची निवडणूक लढवता येणार नाही़
जिल्हा परिषदेचा सदस्य तसेच पंचायत समिती निर्वाचक गणातून निवडणूक लढवणाºया उमेदवारांना पंचायत समितीचा सदस्य होण्यासाठी निवडणूक लढविण्यास २५ जुलै २०१७ पासून पुढील पाच वर्षांसाठी अनर्ह ठरविण्यात आले आहे़ या निवडणुकीसाठी अपात्र झालेल्या उमेदवारांना विभागीय आयुक्तांकडे मात्र दाद मागता येणार आहे़ या निवडणुकीतील उमेदवारांनी विहित वेळेत खर्च सादर न केल्यामुळे त्यांच्यावर कारवाईचा बडगा उगारण्यात आला आहे़ त्यामध्ये किनवट तालुक्यातील १९, हिमायतनगर ६, हदगाव २, अर्धापूर १, नांदेड ८, मुदखेड ९, भोकर १, उमरी ०, धर्माबाद ४, बिलोली ७, नायगाव ४, लोहा १, कंधार ३, मुखेड १२, देगलूर तालुक्यातील १५ उमेदवारांचा समावेश आहे़ त्यामध्ये ३७४ उमेदवारांनी जिल्हा परिषदेची तर ६०३ उमेदवारांनी पंचायत समितीची निवडणूक लढविली होती़ त्यापैकी जिल्हा परिषदेच्या ३२२ तर पंचायत समित्याच्या ५११ उमेदवारांनी ठरावीक वेळेत निवडणूक आयोगाकडे खर्च सादर केला़ खर्च सादर न केलेल्या जिल्हा परिषदेच्या ५२ तर पंचायत समितीच्या ९२ उमेदवारांना पुढील पाच वर्षांसाठी अपात्र ठरविले़