१४८७८ विद्यार्थ्यांनी दिली दहावीची परीक्षा
By Admin | Published: March 1, 2016 11:36 PM2016-03-01T23:36:56+5:302016-03-01T23:51:54+5:30
हिंगोली : दहावीच्या परीक्षेस १ मार्चपासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील ४५ परीक्षा केंद्रावरून १५२८४ पैकी १४९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली.
हिंगोली : दहावीच्या परीक्षेस १ मार्चपासून प्रारंभ झाला असून जिल्ह्यातील ४५ परीक्षा केंद्रावरून १५२८४ पैकी १४९७८ विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली. तर ३१२ विद्यार्थी परीक्षेस गैरहजर राहिल्याची माहिती उपशिक्षणाधिकारी व्ही. जी. पाटील यांनी दिली.
परीक्षा कालावधित कुठलाही अनुचित प्रकार घडणार नाही, याची काळजी शिक्षण विभागाकडून घेतली जात आहे. त्याचबरोबर चोख पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. तसेच ४५ बैठे तर ७ भरारी पथकाद्वारे परीक्षेची पाहणी करण्यात आली. शिक्षणाधिकारी डी. आर. चवणे यांनी बहुविध प्रशालेस भेट देऊन तपासणी केली. तसेच नेमणूक केलेल्या पथकांनी परीक्षा केंद्रांना थेट भेट देत परीक्षा कक्षाची पाहणी केली. महिला विशेष पथक सहभागी होते. १४ हजार ९७८ विद्यार्थ्यांनी मराठी विषयाची परीक्षा दिली. तर ३०६ अनुपस्थित होते. तसेच उर्दू माध्यम ६१५ पैकी ६०९ व हिंदी माध्यमच्या ४५ पैकी ४५ विद्यार्थी परीक्षेस हजर होते.
या परीक्षेमुळे विविध शाळा परिसरात पालकांची गर्दी झाल्याचे चित्र पहायला मिळाले. पेपरपूर्वी बहुतांश मुलांना पालक सूचना देताना दिसले. तसेच अनेकजण शाळेसमोरच विसावा घेत बसले होते. (प्रतिनिधी)