सांडपाण्यावर दुष्काळातही १५ एकर शेती हिरवीगार
By Admin | Published: April 20, 2016 11:04 PM2016-04-20T23:04:24+5:302016-04-20T23:47:56+5:30
बीड : शहरातील शाहूनगर, अहमदनगर रोड भागातील गटारीमधून वहीवाट वाट हाणोऱ्या सांडपाण्यावर जालना रोडलगत तालुक्यातील
बीड : शहरातील शाहूनगर, अहमदनगर रोड भागातील गटारीमधून वहीवाट वाट हाणोऱ्या सांडपाण्यावर जालना रोडलगत तालुक्यातील आनंदवाडी येथील सरपंच कौशाल्या दिलीप चौरे यांनी तब्बल १५ एक्कर शेत जमीन जोपासली आहे. त्यामुळे सांडपण्याचा तर उपयोग झाला आहे शिवाय लाखोंचे उत्पन्न ते ही महिन्याकाठी घेत आहेत.
जिल्हाधिकारी कार्यालय, शाहूनगर परिसरातील सांडपाण्याची विल्हेवाट आनंदवाडी नजीकच्या करपरा नदीत केली जाते. कौशल्या चौरे यांची जालना रोडलगत १५ एक्कर शेती आहे. नालीपासून १०० फूट अंतरावर शेताजवळ टाकीमध्ये पाण्याची साठवणूक केली जात आहे. त्यामधून २४ तास विद्युत पंपाच्या सहाय्याने सध्याच्या स्थितीमध्येही १५ एक्कर क्षेत्र ओलिताखाली आहे. खरिपात दोन एकरात ३४ क्विंटल गव्हाचे उत्पादन घेतले असून, सध्या बाजरीचे डौलदार पीक उभे आहे.
पाणी आहे म्हणून त्याचा अपव्यय न करता चौरे यांनी भाजीपाला व चारापीकाची लागवड केली आहे. वाफे पद्धतीने लागवड केल्याने पाण्याचा अपव्यय टाळला जात आहे. (प्रतिनिधी)