दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2017 12:25 AM2017-09-25T00:25:32+5:302017-09-25T00:25:32+5:30

जायकवाडी प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाल्याने रब्बी हंगामातील दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.

1.5 lakh hectare area is below average | दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली

googlenewsNext

लोकमत न्यूज नेटवर्क
परभणी : जायकवाडी प्रकल्पासह जिल्ह्यातील इतर धरणांमध्ये बºयापैकी पाणीसाठा झाल्याने रब्बी हंगामातील दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे. त्यामुळे शेतकºयांमध्ये समाधानाचे वातावरण आहे.
परभणी जिल्ह्यात खरीप आणि रब्बी हे दोन हंगाम घेतले जातात. खरीप हंगाम हा शेतकºयांच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण हंगाम असला तरी रबी हंगामावरही अनेक शेतकºयांची भिस्त असते. या हंगामावरही शेतकरी लक्ष केंद्रीत करतात. सरासरी सर्वच शेतकरी दोन्ही हंगाम घेतात. परभणी जिल्ह्यात रब्बी हंगाम हा परतीच्या पावसावर अवलंबून आहे. गहू, ज्वारी, हरभरा, करडई ही पिके रब्बी हंगामात घेतले जातात.
यावर्षी खरीप हंगामामध्ये सुरुवातीचे दोन महिने पावसाने ताण दिल्यामुळे पिकांच्या उत्पादनात घट आली असली तरी रबी हंगामात मात्र शेतकºयांसाठी चांगले दिवस आले आहेत.
परभणी जिल्ह्यात सिंचनाचे प्रमाण इतर जिल्ह्याच्या तुलनेत अधिक आहे. येलदरी, निम्न दुधना या दोन प्रमुख प्रकल्पाबरोबरच करपरा आणि मासोळी या मध्यम प्रकल्पांवर शेत जमिनीचे सिंचन होते. त्याचबरोबर जायकवाडी प्रकल्पाचा डावा कालवा परभणी जिल्ह्यातून गेला आहे. त्यामुळे या कालव्यावरही मोठ्या प्रमाणात जिल्ह्यातील जमीन सिंचनाखाली येते. यावर्षी जायकवाडी प्रकल्पात ९८ टक्के पाणीसाठा झाला आहे. त्याचप्रमाणे निम्न दुधना प्रकल्पात ७५ टक्के पाणीसाठा उपलब्ध आहे. गंगाखेड तालुक्यातील मासोळी प्रकल्पात १४ टक्के तर येलदरी प्रकल्पात ११.५७ टक्के पाणीसाठा झाल्याने खरीप हंगामामध्ये जवळपास दीड लाख हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार असल्याचे कृषी विभागाच्या वतीने सांगण्यात आले. त्यामुळे यावर्षीचा रब्बी हंगाम परभणी जिल्ह्यातील शेतकºयांसाठी आशादायक ठरत आहे.

Web Title: 1.5 lakh hectare area is below average

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.