१५ टक्के नेत्र रुग्णांना रस्त्यांवरील धुळीचा फटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 16, 2018 12:17 AM2018-09-16T00:17:09+5:302018-09-16T00:18:45+5:30
शहरातील खड्डेमय आणि खडीमय रस्ते नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आणत असून, नेत्र रुग्णालयात येणाऱ्या १५ टक्के रुग्णांना धुळीचा फटका बसत असल्याचे समोर आले आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : शहरातील खड्डेमय आणि खडीमय रस्ते नागरिकांच्या डोळ्यांत पाणी आणत असून, नेत्र रुग्णालयात येणाऱ्या १५ टक्के रुग्णांना धुळीचा फटका बसत असल्याचे समोर आले आहे. वाहनचालकांच्या डोळ्यात खडीची कच जाण्याचा प्रकार होत आहे. परिणामी डोळे लाल,जळजळ होणे, सुजल्याने रुग्णालय गाठण्याची वेळ नागरिकांवर ओढावत आहे.
जालना रोड, महावीर चौक ते रेल्वेस्टेशन रस्त्यासह शहरातील मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांना सध्या खड्ड्यांचा विळखा पडला आहे. या खड्ड्यांमध्ये खडी, माती टाकून रस्त्यांची दुरवस्था झाकण्याचा प्रयत्न केला जात आहे; परंतु खड्डे बुजविण्यासाठी टाक लेली खडी संपूर्ण रस्त्यावर पसरून नागरिकांच्या डोळ्यांना दुखापत करण्यास कारणीभूत ठरत आहे. वाहनांच्या वर्दळीमुळे खडीचा बारीक कच हवेद्वारे दुचाकीचालक, पादचाºयांच्या डोळ्यात जाण्याचा प्रकार वाढत आहे.
अनेक दुचाकीचालकांच्या हेल्मेटला काच नसते. तसेच गॉगल्सचाही वापर केला जात नाही. परिणामी डोळ्यात धुळीचे, खडीचे कण गेल्यानंतर भरधाव दुचाकी अचानक थांबविण्याचा प्रकार शहरातील रस्त्यांवर होत आहे. त्यातून अपघाताचाही धोका निर्माण होत आहे.
बारीक खडीमुळे डोळे चोळले जातात. प्रचंड वेदनेने डोळे लाल होणे, डोळ्यातून सतत पाणी येणे,डोळे सुजण्याचा प्रकार होत आहे.
नेत्र रुग्णालयात दररोज येणाºया एकूण रुग्णांपैकी १५ टक्के रुग्णांना असा त्रास होत असल्याचे नेत्रतज्ज्ञांनी सांगितले.
औषधाने आराम, रस्ते ‘जैसे थे’
रुग्णांना औषधाने आराम मिळतो; परंतु रस्ते जैसे थे आहेत. त्यामुळे डोळ्यात पुन्हा धूळ जाण्याचा प्रकार होत आहे. त्यामुळे एकाच रुग्णाला वारंवार या त्रासाला सामोरे जावे लागते.
...
धुळीमुळे डोळे लाल होणे,जळजळ होणे आदी त्रास होत असल्याची तक्रार घेऊन येणाºया रुग्णांचे प्रमाण १५ टक्के आहे. कचºयाच्या परिस्थितीनेही डोळ्यांना संसर्ग होऊन डोळे येण्याचा प्रकार होतो. नागरिकांनी खबरदारी घेऊन दुचाकी चालविताना हेल्मेट, गॉगलचा वापर करण्यास प्राधान्य द्याव.
- डॉ. सुनील कसबेकर, अध्यक्ष, औरंगाबाद नेत्रतज्ज्ञ संघटना