प्रेमसंबंधातून १५ वर्षीय प्रेयसी चार महिन्यांची गर्भवती; अल्पवयीन प्रियकर पसार

By ऑनलाइन लोकमत | Published: June 14, 2024 04:21 PM2024-06-14T16:21:16+5:302024-06-14T16:22:13+5:30

गर्भवती असल्याचे समजताच पीडितेने फोडला टाहो; वाळूज परिसरातील खळबळजनक घटना.

15-year-old girlfriend four months pregnant from affair; FIR against a minor lover | प्रेमसंबंधातून १५ वर्षीय प्रेयसी चार महिन्यांची गर्भवती; अल्पवयीन प्रियकर पसार

प्रेमसंबंधातून १५ वर्षीय प्रेयसी चार महिन्यांची गर्भवती; अल्पवयीन प्रियकर पसार

वाळूज महानगर: प्रेमसंबंधातून १५ वर्षीय प्रेयसी गर्भवती झाल्याची खळबळजनक घटना वाळूज परिसरात उघडकीस आली आहे. पोटदुखीचा त्रास होत असल्याने आईने उपचारासाठी रुग्णालयात दाखल केल्यानंतर मुलगी गर्भवती असल्याचा धक्कादायक प्रकार पुढे आला. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून १८ वर्षीय प्रियकराचा पोलीसांकडून शोध सुरु आहे.

दिक्षा (१५, नाव बदलले आहे) ही आई व लहान भावासोबत वाळूज परिसरात वास्तव्यास आहे. दिक्षा हिच्या आई-वडिलांचे आपसात पटत नसल्याने ते दोघेही विभक्त राहतात. कंपनीत काम करून दोन्ही मुलांचा सांभाळ आई करते. दोन वर्षापूर्वी दिक्षाची ओळख एकाच शाळेत असणाऱ्या गल्लीतील नितीन (१८, नाव बदलले आहे) याच्यासोबत झाली. या ओळखीतून दोघांची मैत्रीझाली अन् सोशलमिडियाच्या चॅटिंगनंतर एकमेकांनी प्रेमाच्या आणाभाका घेतल्या.

दरम्यान, आई कंपनीत कामाला गेल्यावर नितीन हा घरी एकट्या असलेल्या दिक्षाला भेटण्यासाठी येत असे. प्रेमात आकंठ बुडालेले दोघेही घरी कोणी नसताना सतत एकमेकांना भेटत होते. काही दिवसांपूर्वी नितीने दीक्षासोबत शारिरीक संबध प्रस्थापित केले. यानंतर अनेकवेळा नितीनने दिक्षावर घरी जाऊन अत्याचार केला. पोटदुखीचा त्रास झाल्याने दवाखान्यात गेल्यास दीक्षा चार महिन्यांची गर्भवती असल्याचे उघडकीस आले. याप्रकरणी दिक्षा हिच्या तक्रारीवरुन नितीन याच्याविरुध्द एमआयडीसी वाळूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कृष्णा शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक श्रद्धा वायदंडे या करीत आहेत. 

मुल नको, म्हणत फोडला टाहो
दरम्यान, दिक्षाचे पोट दुखत असल्याने आईने तिला उपचारासाठी शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. उपचारादरम्यान डॉक्टरांनी दिक्षा चार महिन्यांची गर्भवती असल्याचे सांगताच आईला मोठा धक्का बसला. आईने विश्वासात घेऊन चौकशी केली असता दीक्षाने घरी कोणी नसताना नितीने अत्याचार केल्याचे सांगितले. अत्याचारामुळे गर्भधारणा राहिल्याचे लक्षात येताच दीक्षाने टाहो फोडला. अजाणतेपणात चूक झाली, मुल नको, अशी विनवणी ती आईकडे करू लागली. 

Web Title: 15-year-old girlfriend four months pregnant from affair; FIR against a minor lover

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.