रस्त्यांसाठी १५० कोटींची मागणी
By Admin | Published: May 11, 2016 12:22 AM2016-05-11T00:22:02+5:302016-05-11T00:48:59+5:30
औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी शासनाकडे दीडशे कोटी रुपयांची मागणी करणारा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला.
औरंगाबाद : शहरातील रस्ते गुळगुळीत करण्यासाठी शासनाकडे दीडशे कोटी रुपयांची मागणी करणारा प्रस्ताव महापालिकेच्या सर्वसाधारण सभेत मंजूर करण्यात आला. दीडशे कोटी रुपयांमध्ये मनपा आपला वाटा म्हणून काही रक्कम टाकणार असून, मंजूर प्रस्ताव त्वरित शासनाकडे सादर करण्याचे आदेश महापौर त्र्यंबक तुपे यांनी प्रशासनाला दिले.
आंतरराष्ट्रीय पातळीवर औरंगाबादची प्रतिमा खड्ड्यांचे शहर म्हणून उदयास येत आहे. महानगरपालिकेने व्हॉईट टॅपिंगसह डांबरी रस्त्यांच्या कामांकडे विशेष लक्ष दिले आहे. २५ ते ३० रस्त्यांची आतापर्यंत कामे झाली आहेत. केंद्र शासनाच्या स्मार्ट सिटी योजनेत सहभागी होण्यासाठी नागरिकांना मूलभूत सोयी सुविधा द्याव्या लागणार आहेत. रस्त्यांची कामे करण्यासाठी राज्य शासनाकडे १५० कोटी रुपयांची मागणी करण्यात आली आहे. सर्वसाधारण सभेत मागणीचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला. तुपे यांनी प्रशासनाने तातडीने प्रस्ताव तयार करावा, असे आदेश दिले.