१५० मीटरच्या जैन ध्वजाने औरंगाबादकरांचे लक्ष वेधले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2018 12:04 AM2018-01-16T00:04:13+5:302018-01-16T00:04:21+5:30
परमेष्ठी ग्रुपच्या वतीने आयोजित गुरुगणेश तीर्थदर्शन पदयात्रा रविवारी सकाळी जालन्याकडे रवाना झाली. पदयात्रेत भाविकांनी १५० मीटर लांबीचा जैन ध्वज हाती घेतला होता. सर्वात लांब जैन ध्वजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते. कुंभारवाडा येथील महावीर भवन येथे सकाळी मिठाला
लोकमत न्यूज नेटवर्क
औरंगाबाद : परमेष्ठी ग्रुपच्या वतीने आयोजित गुरुगणेश तीर्थदर्शन पदयात्रा रविवारी सकाळी जालन्याकडे रवाना झाली. पदयात्रेत भाविकांनी १५० मीटर लांबीचा जैन ध्वज हाती घेतला होता. सर्वात लांब जैन ध्वजाने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
कुंभारवाडा येथील महावीर भवन येथे सकाळी मिठालाल कांकरिया, कन्हैयालाल रुणवाल, डॉ. प्रकाश झांबड, दिलीप मुगदिया आदी मान्यवरांनी यावेळी पदयात्रेस ध्वज दाखवला.
कर्नाटक गजकेशरी गणेशलालजी म.सा. यांच्या पुण्यतिथीनिमित्त मागील १० वर्षांपासून औरंगाबाद ते जालना अशी पदयात्रा काढण्यात येते. यंदा या पदयात्रेत १५० मीटर ध्वज सर्वांचे आकर्षण ठरले. पदयात्रेत सहभागी शेकडो भाविक ध्वज हातात घेऊन पुढे जात होते.
‘अहिंसा परमो धर्म की जय’, ‘ जिओ और जिने दो’ असा जयघोष करीत भाविक औरंगपुरा, क्रांतीचौक, जालना रोडमार्गे जालन्याकडे रवाना झाले. १६ जानेवारी रोजी गणेशलालजी म.सा. यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी पदयात्रा जालन्यात पोहोचणार आहे. यंदा या पदयात्रेचे ११ वे वर्ष आहे. यावेळी जी.एम. बोथरा, विनोद बोकडिया, रवी लोढा, झुंबरलाल पगारिया, सुभाष देसरडा, राजेंद्र बोरा, सुभाष सुराणा, सुनील बंब, संतोष बोरा, प्रीतेश बोरा आदींची उपस्थिती होती.