समृद्धी महामार्गासाठी १५५ हेक्टर जमिनीचे संपादन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 10, 2017 11:29 PM2017-12-10T23:29:32+5:302017-12-10T23:29:40+5:30
राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करण्याच्या कामाला वैजापूर तालुक्यात वेग आला आहे. आतापर्यंत तालुक्यातील १५ गावांतील १५५ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून शेतक-यांना तब्बल १२५ कोटी रुपयांचा मावेजा वाटप करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी दिली.
लोकमत न्यूज नेटवर्क
वैजापूर : राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी समृद्धी महामार्गासाठी जमीन संपादन करण्याच्या कामाला वैजापूर तालुक्यात वेग आला आहे. आतापर्यंत तालुक्यातील १५ गावांतील १५५ हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले असून शेतक-यांना तब्बल १२५ कोटी रुपयांचा मावेजा वाटप करण्यात आल्याची माहिती उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी दिली.
समृद्धी महामार्गासाठी तालुक्यातील डवाळा, अगरसायगाव, शिवराई, पालखेड, गोळवाडी, घायगाव, वैजापूर ग्रामीण, करंजगाव, कनकसागज, खंबाळा, सुराळा, हडसपिंपळगांव, दहेगाव, जांबरगाव, लासूरगाव या १५ गावातील जमीन संपादीत करण्यात येणार आहे. या गावातून महामार्गाचा ४३ कि.मी. अंतराचा रस्ता जातो. प्रशासनाने या गावातील जमिनीच्या संपादनाची प्रक्रिया सुरु केली आहे.
शेतकºयांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे आतापर्यंत १५४.१०८३ हेक्टर क्षेत्रफळाची खरेदी करण्यात आली आहे. शेतक-यांना १२५ कोटी रुपयांचे वाटप देखील करण्यात आले आहे. ११३० लाभार्थी शेतकºयांपैकी २६६ शेतकºयांनी यासाठी आवश्यक संमती दिली आहे.
दळणवळणासाठी महत्त्वाचा असणारा हा मार्ग उन्नतीसाठीही पूरक ठरणार आहे. या महामार्गामुळे पंधराही गावांना उर्जितावस्था येणार आहे. सुरुवातीला या महामार्गाबद्दल असणाºया उलटसुलट चर्चेमुळे व फारशी माहिती उपलब्ध नसल्याने गैरसमजातून अनेकांनी विरोधाची भूमिका घेतली होती. परंतु जमिनीचा योग्य मोबदला व जिल्ह्याच्या दळणवळणासाठी असणारे महत्त्व पाहता हा विरोध आता कमी होत असल्याचे दिसत आहे.
कोणत्याही भागाच्या प्रगतीसाठी दळणवळणाची प्रभावी साधने सहायकारी असतात. तालुक्यात लोहमार्गाचे जाळे कमी आहे. त्यामुळे महामार्गातून ती हानी भरण्याची संधी समृद्धी महामार्गाच्या माध्यमातून मिळणार आहे.
जिल्हा समितीकडून १५ गावांचे मूल्यांकन
समृद्धी महामार्गातील जमीन संपादित करण्यासाठी यापूर्वी अप्पर जिल्हाधिकारी समृद्धी महामार्ग यांनाच अधिकार होते. परंतु आता उपविभागीय अधिकारी तथा वैजापूर व गंगापूर तहसीलदारांना तसा अधिकार प्रधान केल्याने कामाची गती वाढली आहे. उपविभागीय अधिकारी डॉ. संदीपान सानप आणि तहसीलदार सुमन मोरे यांनी वळोवेळी शेतकºयांशी संवाद साधत येणाºया अडचणी सोडविण्यास प्राधान्य दिले आहे.
या रस्त्यासाठी ४५३ हेक्टरची आवश्यकता आहे. जिल्हा समितीकडून शेतकरीनिहाय मूल्यांकननिश्चिती कामाला वेग देण्यात आला असून १५ गावांचे मूल्यांकन झाल्याची माहिती प्रशासनाने दिली.
शेतकºयांच्या सकारात्मक प्रतिसादामुळे ११३० भूधारकांची संमती मिळाली असून १५ गावांचे मूल्यांकनही पूर्ण करण्यात आले आहे, असे उपविभागिय अधिकारी डॉ. संदीपान सानप यांनी सांगितले.