आमदार निधीतून १६ कोटींच्या कामांना मंजुरी

By Admin | Published: March 18, 2016 01:28 AM2016-03-18T01:28:04+5:302016-03-18T01:56:22+5:30

हणमंत गायकवाड , लातूर जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघातील आमदारांनी आपल्या आमदार निधीतून

16 crores sanctioned from MLA fund | आमदार निधीतून १६ कोटींच्या कामांना मंजुरी

आमदार निधीतून १६ कोटींच्या कामांना मंजुरी

googlenewsNext


हणमंत गायकवाड , लातूर
जिल्ह्यातील सहा विधानसभा मतदारसंघातील आमदार तसेच स्थानिक स्वराज्य संस्था व शिक्षक मतदारसंघातील आमदारांनी आपल्या आमदार निधीतून केल्या जाणाऱ्या कामाचे नियोजन केले आहे़ एकूण १६ कोटी ४७ लाखांच्या कामांना मंजुरी देण्यात आली असून, आमदारांनी आपल्या निर्धारीत निधीपेक्षा जास्त निधीच्या कामांना मंजुरी देऊन ठेवली आहे़ निर्धारीत निधीपेक्षा १ कोटींच्या जास्त कामांना मंजुरी देण्याचा अधिकार आहे़ या अधिकाराचा पुरेपुर वापर आठही आमदारांनी केला आहे़
जिल्ह्यातील आमदारांचा गतवर्षी २०१४-१५ मध्ये खर्च न झालेला ८ कोटी ७१ लाख रुपयांचा निधी शासनाकडे समर्पित करण्यात आला होता़ तो निधीही यंदाच्या चालू आर्थिक वर्षात परत मिळाला असून जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात ४ कोटी ३५ लाख रुपये आणि फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ४ कोटी ३५ लाख असा एकूण शासनाकडे समर्पित झालेला निधी ८ कोटी ७१ लाख रुपये प्राप्त झाला असून तो आमदारांनी सुचविलेल्या वेगवेगळ्या कामांवर खर्च करण्यात येत आहे़ जिल्हा परिषद, सार्वजनिक बांधकाम, नगरपालिका आदी यंत्रणांच्या विकास कामांसाठी देण्यात आला आहे़ प्रत्येक आमदारांना दरवर्षी २ कोटीचा निधी विकास निधी म्हणून दिला जातो़ निर्धारीत वर्षात खर्च झाला पाहीजे असे बंधन नाही़ त्यामुळे हा निधी खर्च न झाल्यास शासनाकडे परत जात नाही़ आमदारांनी सुचविलेल्या कामांवरच तो खर्च केला जातो़ फक्त मंजुरी निर्धारीत वर्षातच देणे आवश्यक आहे़ म्हणून चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यातील सहा आमदारांसह अन्य दोन आमदारांनी एकूण १६ कोटी ४७ लाख रुपयांच्या कामांना नियोजन विभागाकडून मंजूरी देऊन ठेवलेली आहे़

Web Title: 16 crores sanctioned from MLA fund

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.